Lokmat Sakhi >Food > हॉटेलस्टाइल गोबी ६५ करण्याची चटपटीत सोपी रेसिपी, ताज्या ताज्या फ्लॉवरचा चटकदार 'स्टार्टर' पदार्थ

हॉटेलस्टाइल गोबी ६५ करण्याची चटपटीत सोपी रेसिपी, ताज्या ताज्या फ्लॉवरचा चटकदार 'स्टार्टर' पदार्थ

Cauliflower 65 Recipe फ्लॉवरची भाजी तर आपण नेहमी करतोच, त्याच भाजीला द्या कुरकुरीत ट्विस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2023 04:54 PM2023-01-11T16:54:14+5:302023-01-11T16:55:18+5:30

Cauliflower 65 Recipe फ्लॉवरची भाजी तर आपण नेहमी करतोच, त्याच भाजीला द्या कुरकुरीत ट्विस्ट

A quick and easy recipe to make Hotel Style Gobi 65, a quick 'starter' of fresh cauliflower. | हॉटेलस्टाइल गोबी ६५ करण्याची चटपटीत सोपी रेसिपी, ताज्या ताज्या फ्लॉवरचा चटकदार 'स्टार्टर' पदार्थ

हॉटेलस्टाइल गोबी ६५ करण्याची चटपटीत सोपी रेसिपी, ताज्या ताज्या फ्लॉवरचा चटकदार 'स्टार्टर' पदार्थ

हिवाळ्यात कॉलीफ्लॉवरचा सिझन सुरू होतो. कॉलीफ्लॉवरची भाजी, भजी, सूप, पराठा असे विविध पदार्थ बनवले जातात. कॉलीफ्लॉवरमध्ये आपण अनेक भाज्यांचा समावेश करून विविध भाज्या बनवू शकता. त्यातील पौष्टिक घटक आपल्या शरीरासाठी उत्तम मानले जाते. फ्लॉवरमध्ये कॅल्शियम, फॉस्फोरस, प्रोटीन, कार्बोहाईड्रेट, व्हिटॉमिन्स, आयोडीन, पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात. सायंकाळी काही तरी चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा होत असेल तर, आपण गोबी ६५ हा पदार्थ बनवू शकता. ही रेसिपी चवीला लज्जतदार तर लागतेच यासह आरोग्यासाठी देखील उत्तम आहे.

गोबी ६५ या रेसिपीसाठी लागणारं साहित्य

कॉलीफ्लॉवर - १

तांदळाचं पीठ

कॉर्नफ्लोर

आलं पावडर

लसूण पावडर

लाल तिखट

काळी मिरी पावडर

धणे पावडर

तेल

कढीपत्ता

मीठ

व्हिनेगर

सोया सॉस

चिली सॉस

टोमॅटो सॉस

पाणी

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये कॉलीफ्लॉवरचे काप १० मिनिटे गरम पाण्यात टाकून ठेवा. दुसऱ्या बाऊलमध्ये लाल तिखट, काळी मिरी पावडर, धणे पावडर, मीठ, आलं पावडर, लसूण पावडर, व्हिनेगर, सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस, कढी पत्ता, कॉर्नफ्लोर, तांदळाचं पीठ आणि पाणी टाकून मिश्रण एकत्र करा.

मिश्रण एकत्र झाल्यानंतर त्यात कॉलीफ्लॉवरचे तुकडे टाका. आणि मिश्रणात चांगले मिक्स करा. एकीकडे तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात कॉलीफ्लॉवरचे तुकडे टाकून तळून घ्या. सोनेरी रंग येईपर्यंत कॉलीफ्लॉवर चांगले तळून घ्या. अशाप्रकारे गोबी ६५ खाण्यासाठी रेडी. आपण हा पदार्थ सॉस सोबत खाऊ शकता.

Web Title: A quick and easy recipe to make Hotel Style Gobi 65, a quick 'starter' of fresh cauliflower.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.