Lokmat Sakhi >Food > घरच्याघरी ' दम ' चहा करण्याची झ्टपट कृती, गारठवणाऱ्या थंडीत असा चहा प्यायला हवा

घरच्याघरी ' दम ' चहा करण्याची झ्टपट कृती, गारठवणाऱ्या थंडीत असा चहा प्यायला हवा

In Winter make Dum Tea at Home कुल्हड चहा, इराणी चहा, बासुंदी चहा, गुळाचा चहा, मसाला चहा प्यायले असाल, आता दम चहा ट्राय करा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2023 01:31 PM2023-01-15T13:31:11+5:302023-01-15T13:32:34+5:30

In Winter make Dum Tea at Home कुल्हड चहा, इराणी चहा, बासुंदी चहा, गुळाचा चहा, मसाला चहा प्यायले असाल, आता दम चहा ट्राय करा..

A quick recipe to make 'Dum' tea at home, one should drink this tea in freezing cold weather | घरच्याघरी ' दम ' चहा करण्याची झ्टपट कृती, गारठवणाऱ्या थंडीत असा चहा प्यायला हवा

घरच्याघरी ' दम ' चहा करण्याची झ्टपट कृती, गारठवणाऱ्या थंडीत असा चहा प्यायला हवा

अनेकांसाठी चहा म्हटलं की जीव की प्राण. ऋतू कोणताही असो चहाचा घोट घेतल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. हिवाळ्यात चहाची क्रेझ सर्वत्र पाहायला मिळते. शरीराला ऊब देण्यासाठी चहा मदत करते. चहाचे वेगवेगळे प्रकार आपण आतापर्यंत ट्राय केले असतील. त्यात कुल्हड चहा, इराणी चहा, बासुंदी चहा, गुळाचा चहा, मसाला चहा असे अनेक प्रकार आहेत. जे चहाचे शौकीन आहेत, त्यांनी नक्कीच हे सगळे प्रकार ट्राय करून पाहिले असतील.

मात्र, आपण कधी दम चहा ट्राय केला आहे का? आता तुम्ही म्हणाल की, दम बिर्याणी, दम आलू, असे पदार्थ खाल्ले आहेत. परंतु, आता दम चहा देखील घरगुती पद्धतीने बनवून पाहा. चला तर मग या हटके चहाची बनवण्याची पद्धत जाणून घेऊया.

दम चहा बनवण्यासाठी लागणारं साहित्य

पाणी

चहापत्ती

साखर

आलं

लवंग

दालचिनी

इलायची

दूध

कृती

सर्वप्रथम, एका ग्लासमध्ये अर्धा कप पाणी टाका. त्या ग्लासवर सुती कपडा रबरच्या सहाय्याने झाकून घ्या. त्यावर चहापत्ती, साखर, आल्याचे काप, लवंग, दालचिनी, इलायची ठेवा.

जाड तळ्याच्या भांड्यात पाणी गरम करत ठेवा. त्यामध्ये चहा बनवण्यासाठी लागणारं साहित्य घालून ठेवलेला ग्लास ठेवा, आणि त्या भांड्यावर झाकण ठेवा. 

एक उकळी आल्यानंतर झाकण काढा. सुतीचे कापड पिळून घ्या. त्यावरील मिश्रण आणि कापड दोन्ही बाजूला काढून घ्या. ग्लासमध्ये आपल्याला कोरा चहा तयार झालेला पाहायला मिळेल. हा तयार दम चहा गरम दुधात मिसळा. एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. अशाप्रकारे दम चहाचा, हुडहुडी थंडीच्या मौसमात आनंद घ्या.

Web Title: A quick recipe to make 'Dum' tea at home, one should drink this tea in freezing cold weather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.