Join us  

एकदम बारीक कांदा कापण्याची सोपी ट्रिक; जास्त वेळ न घालवता कापून होईल कांदा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2023 9:34 AM

A Simple Trick to Finely Chop Onion : हॉटेलसारखा बारीक कांदा  कापण्याची सिक्रेट या व्हिडिओमध्ये पाहूया.

रोजच्या स्वयंपाकात भाज्यांची चव वाढवण्यासाठी कांदा वापरला जातो. कांदा कापणं म्हणजे सगळ्यात अवघड काम घाईघाईत जाड कांदा कापला  जातो. बारीक कांदा कापण अजूनही अनेकांना जमत नाही. एक सोपा कुकींग हॅक तुम्हाला या प्रोब्लेमचं सोल्यूशन देऊ शकतो. (A simple trick to finely chop onion) हॉटेलसारखा बारीक कांदा  कापण्याची सिक्रेट या व्हिडिओमध्ये पाहूया. (Cooking Hacks & Tricks)

1) सर्व प्रथम, जेव्हा तुम्ही बाजारात जाल तेव्हा नेहमी ताजे कांदे खरेदी करा.

2) कांदे कापण्यापूर्वी काही वेळ व्हिनेगरमध्ये ठेवा. असे केल्याने कांदा सोलताना डोळ्यातून अश्रू येणार नाहीत.

3) यानंतर, कांदा कापण्यापूर्वी, काही मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे प्लाझ्मामधून बाहेर पडणारे एन्झाइम कमी प्रमाणात बाहेर पडतील.

4) कांदा कापताना लक्षात ठेवा, नेहमी मुळाच्या बाजूने कापा. याशिवाय कांदा लवकर कापता यावा म्हणून धारदार चाकू वापरावा. सगळ्यात आधी कांदा दोन ते तीन बाजूंनी उभा कापा. त्यानंतर बारीक चिरा.

5) कांद्यामध्ये सल्फर आढळते. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले खराब कोलेस्ट्रॉल स्वच्छ करण्याचे काम होते. तसेच ते ट्रायग्लिसराइडची पातळी कमी होते. उच्च कोलेस्ट्रॉल देखील यामुळे टाळता येते.

6) कांदा कापताना जर तुम्ही मेणबत्ती किंवा दिवा लावला तर त्यातून निघणारा वायू तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही आणि तुमच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यकिचन टिप्स