चपात्या करण्याचं काम खूपच किचकट असतं. (Chapati Making Tips) पण चपातीशिवाय भारतीय जेवण अपूर्णच आहे. चपात्या खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही असं अनेकांचे असते. (Cooking Hacks) सकाळी घाईच्यावेळी चपात्या करणं एखाद्या मोठ्या टास्कप्रमाणेच आहे. सकाळी चपात्या करण्यासाठी तुम्ही सोप्या ट्रिक्स वापरू शकता. ज्यामुळे कमीत कमी वेळेत तुमचं काम सोपं होईल. (How to Make Soft Chapati At Home)
चपात्या करण्यासाठी तुम्हाला फार काही करावं लागणार नाही. चपात्या करण्याची सोपी पद्धत एका व्हिडिओतून तुम्हाला दिसून येईल. (How To Make Chapati) पहिल्यांदा चपात्या करताना कधी पिठात पाणी जास्त होतं. तर कधी चपाती लाटताना तुटते. चपात्या करण्यासाठी तुम्हाला फार काही करावं लागणार नाही. फक्त व्हिडिओत दिलेल्या काही टिप्स फॉलो कराव्या लागतील.
१) सगळ्यात आधी एका भांड्यात गव्हाचे पीठ घ्या. त्यात थोडं पाणी घालून ते पातळ करा. जसं आपण डोश्यासाठी पीठ बनवतो त्या पद्धतीनेच करा. गॅस सुरू करून त्यावर तवा ठेवा.
२) तवा तापल्यानंतर गव्हाचं पातळ केलेलं पीठ अशा खोल चमच्यात घ्या, नंतर तव्यावर गोलाकार पसरवून घ्या. हे पीठ पसरवताना जाड आणि पातळ पसरवू नका. एक बाजू शेकल्यानंतर चपाती पलटी करून घ्या. त्यानंतर दोन्ही बाजूंनी व्यवस्थित शेकवून घ्या.
३) ही चपाती हळूहळू फुगलेली दिसेल ही चपाती दोन्ही बाजूंनी व्यवस्थित शेकली जाईल याची काळजी घ्या. पीठ न मळता, न लाटता केलेली चपाती पाहून कोणाचाही विश्वास बसणार नाही.
जेव्हा तुम्ही चपाती करण्यात एक्सपर्ट नसतात तेव्हा पीठ मळताना विशेष काळजी घ्यायला हवी. पीठ जास्त कडक किंवा जास्त लूज असू नये. पीठ मळण्याासाठी गरम पाणी, दूध किंवा तूपाचा वापर करू शकता. पीठ मळल्यानंतर सुती कापडाचा वापर करा. प्लेटमध्ये काहीवेळा झाकून ठेवा.
पोट मांड्या सुटल्या-फिगर जाड दिसते? रोज लो कॅलरी ५ पदार्थ खा, झरझर वजन कमी होईल
गोल गोल चपाती करण्यासाठी चपाती गोल करा. त्यावर सुकं पीठ लावून चपटे करून घ्या. नंतर चपाती हलक्या हाताने एंटी क्लॉकवाईज फिरवा. चपाती पटलून घ्या, फुललेली, मऊ चपाती करण्याासाठी जास्त पातळ करू नका. चपाती ३ ते ४ वेळा फिरवून शेकून घ्या.