Lokmat Sakhi >Food > मेथी साठवून ठेवण्याची एक सोपी ट्रिक, सुकण्याची भीती नाही, टिकेल १० दिवस

मेथी साठवून ठेवण्याची एक सोपी ट्रिक, सुकण्याची भीती नाही, टिकेल १० दिवस

2 Simple Tips To Keep Your Methi Fresh For Longer मेथी जास्त दिवस फ्रेश राहेल, करून पाहा एक सोपी - झटपट ट्रिक..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2023 12:00 PM2023-02-22T12:00:27+5:302023-02-22T12:02:03+5:30

2 Simple Tips To Keep Your Methi Fresh For Longer मेथी जास्त दिवस फ्रेश राहेल, करून पाहा एक सोपी - झटपट ट्रिक..

A simple trick to store fenugreek, no fear of drying, lasts for 10 days | मेथी साठवून ठेवण्याची एक सोपी ट्रिक, सुकण्याची भीती नाही, टिकेल १० दिवस

मेथी साठवून ठेवण्याची एक सोपी ट्रिक, सुकण्याची भीती नाही, टिकेल १० दिवस

हिरव्या पानांची भाजी पौष्टीक्तेने समृद्ध असते. मेथीच्या भाजीपासून विविध पदार्थ बनवले जातात. आरोग्य उत्तम राखण्यासाठी मेथी खाण्याचा सल्ला दिला जातो. हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर मेथी मिळते. मेथीचा गुणधर्म मुळात गरम असल्यामुळे भाजी खाणे फायदेशीर ठरते. त्यातील अँन्टिऑक्सिडंट गुणधर्मामुळे कर्करोग, मधुमेह व उच्च रक्तदाब यांना प्रतिबंध होण्यास मदत होते.

मेथीच्या पानांमध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस आणि प्रथिने, व्हिटॅमिन के जास्त प्रमाणात आढळतात. त्यामुळे ही भाजी खाल्ल्याने आरोग्याला फायदाच होतो. मात्र, मेथी निवडून घेतल्यानंतर ती लवकर खराब होते. बाजारातून मेथी आणल्यानंतर तिला निवडून लगेच भाजी बनवावी लागते. कारण मेथीचे पानं मऊ आणि नाजूक असल्यामुळे ते लगेच सुकतात. आपल्याला जर मेथीची भाजी निवडल्यानंतर स्टोर करायची असेल तर एक सोपी ट्रिक आपल्या कामी येईल. 

मेथी साठवून ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक

सर्वप्रथम, मेथीची भाजी चांगली निवडून घ्या. मेथीची भाजी निवडून घेतल्यानंतर एक एअर टाईट डब्बा घ्या. तो डब्बा चांगला पुसून घ्या. त्यानंतर त्यात टिश्यू पेपर पसरवून ठेवा. त्यात निवडून घेतलेली मेथी पसरवून ठेवा. मेथी निवडताना चांगली निवडा, त्यात इतर माती किंवा घाण येता कामा नये. त्यामुळे मेथी खराब होण्याची शक्यता असते.

रात्री भात जास्त उरला? करा क्रिस्पी भात वडे - नाश्ता झटपट, खा पोटभर

मेथी डब्ब्यात भरल्यानंतर त्यावर आणखी एक टिश्यू पेपर ठेवा. आता डब्बा झाकणाने बंद करा. हा डब्बा फ्रिजमध्ये ठेवा. या ट्रिकमुळे मेथी १० दिवस तरी आरामात टिकेल.

सुखी मेथी साठवून ठेवण्याची ट्रिक

सुखी मेथी साठवून ठेवण्यासाठी सर्वप्रथम मेथी चांगली निवडून घ्या. निवडल्यानंतर मेथीला चांगले धुवून घ्या. मेथी धुवून झाल्यानंतर तिला सुकवण्यासाठी उन्हामध्ये ठेवा. आपण याचा वापर कसुरी मेथी म्हणून देखील करू शकता. अथवा याची भाजी देखील बनवू शकता. मेथी सुकवून घेतल्यानंतर तिला एअर टाईट डब्ब्यात झाकून ठेवा.

Web Title: A simple trick to store fenugreek, no fear of drying, lasts for 10 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.