Lokmat Sakhi >Food > झणझणीत लसूण-मिरचीची चटणी साध्या जेवणाची वाढवेल रंगत; ही  घ्या सोपी, चविष्ट रेसेपी

झणझणीत लसूण-मिरचीची चटणी साध्या जेवणाची वाढवेल रंगत; ही  घ्या सोपी, चविष्ट रेसेपी

रोजच्या जेवणात काहीतरी वेगळं तोंडी लावणीसाठी असेल तर जेवायला भारीच मजा येते. नाहीतर तेच तेच  खाऊन खूपच  कंटाळा आलेला असतो. ...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 03:08 PM2023-01-01T15:08:58+5:302023-01-01T15:12:47+5:30

रोजच्या जेवणात काहीतरी वेगळं तोंडी लावणीसाठी असेल तर जेवायला भारीच मजा येते. नाहीतर तेच तेच  खाऊन खूपच  कंटाळा आलेला असतो. ...

A tangy garlic-chili chutney will add color to a simple meal; Check out this easy, delicious recipe | झणझणीत लसूण-मिरचीची चटणी साध्या जेवणाची वाढवेल रंगत; ही  घ्या सोपी, चविष्ट रेसेपी

झणझणीत लसूण-मिरचीची चटणी साध्या जेवणाची वाढवेल रंगत; ही  घ्या सोपी, चविष्ट रेसेपी

रोजच्या जेवणात काहीतरी वेगळं तोंडी लावणीसाठी असेल तर जेवायला भारीच मजा येते. नाहीतर तेच तेच  खाऊन खूपच  कंटाळा आलेला असतो.  तिळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी तुम्ही आत्तापर्यंत अनेकदा ट्राय केली असेल पण लसणू लाल मिरचीची ही चटणी जेवणाची रंगत नक्कीच वाढवेल. (Cooking Tips & Tricks)   घरी नावडती भाजी बनवली असेल तर चपाती किंवा भाकरीबरोबर तुम्ही ही चटणी ट्राय करू शकता. ही चटणी करायला अगदी सोपी आहे. डाळ भातासोबत किंवा पुलाव बनवला असेल तर तोंडी लावणीसाठी ही चटणी उत्तम पर्याय आहे. (How to make garlic mirchi chutney)

लसूण मिरचीची चटणी वेगळ्या पद्धतीनं बनवा

1) सर्व प्रथम कोरड्या लाल मिरच्या कोमट पाण्यात भिजवून घ्या. नंतर मिक्सरमध्ये बारीक करा.

२) चिंच साधारण १ तास पाण्यात भिजत ठेवा.

३) चिंचेचा रस कोणत्याही भांड्यात गाळून बाजूला ठेवा. 

४) आता गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवा.

५)  गरम तेलात जीरं,  वाटलेले लसूण, मीठ, चिंचेचे पाणी आणि कोरड्या लाल मिरचीची पेस्ट घालून चांगले शिजवा.

६) पेस्ट घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. ही चटणी तुम्ही जवळपास १ आठवडाभर ठेवू शकता.

Web Title: A tangy garlic-chili chutney will add color to a simple meal; Check out this easy, delicious recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.