दिवाळी जवळ आली. त्यात फराळ म्हटलं कि सगळ्यांना गोड पदार्थामध्ये लाडू प्रिय असते. कोणाला कळीचे लाडू, किंवा बेसनाचे लाडू आवडतात. मात्र, शेवेचे लाडू ही अनेकांना आवडतात. चवीला वेगळे आणि खास पारंपरिक पदार्थ. शेवेचे पारंपरिक लाडू करण्याची ही घ्या पारंपरिक कृती.
शेव बनविण्यासाठी साहित्य :-
दिड किलो बेसन१ चमचा हळद१ ग्लास पाणी तेल पाक बनविण्यासाठी साहित्य :-
सव्वा किलो साखरदिड ग्लास पाणी
सजावटीसाठी इतर साहित्य :-
१ वाटी मनुके१ वाटी काजूचे तुकडे१ वाटी वितळलेलं तूपपाव वाटी वेलची पूड
५०० ग्रॅम बेसनपीठाला ४०० ग्रॅम साखर घ्या, आणि साखर बुडेल इतके पाणी घाला.(अर्धा ग्लास)१ किलो बेसनपीठाला ८०० ग्रॅम साखर घ्या आणि साखर बुडेल इतके पाणी घाला.
कृती :-
सर्वप्रथम, १ किलो चणाडाळ उन्हात वाळवून दळून आणावे. त्यानंतर हे पीठ एका परातीत घेवून त्यात किंचित मीठ व आवश्यक पाणी घालून मळून घ्यावे. पीठ घट्ट नसून सैलसर मळून घ्यायचे जेणेकरून शेव जाड नसून खुसखुशीत होईल. त्यानंतर थोडे थोडे पीठ साच्यात घालून याची बारीक शेव पाडावे व मंद आचेवर तळून घ्यावे. थोड्यावेळानंतर तळलेली शेव कुस्करून घ्या. आता पाक करण्यासाठी गॅस वर १ मध्यम आकाराचा ग्लास (२ कप) पाणी गरम करत ठेवा. यात पाऊन किलो साखर घालून १ तारी पाक बनवून घ्या. गॅस बंद करून त्यात जायफळ व वेलची पावडर घाला. आवडत असल्यास मनुके व काजूचे तुकडे घाला.
त्यानंतर कुस्करून ठेवलेली शेव त्यात घालून चांगले हलवून मिक्स करा. ५ मि. झाकण ठेवून तसेच ठेवावे. त्यानंतर ५ मिनिटानंतर लाडू वळवून घ्यावे. अश्याप्रकारे आपले शेवचे लाडू तयार होतील.