Join us  

आषाढ तळला की नाही? घ्या आषाढ स्पेशल पारंपरिक गोड पुऱ्या करण्याची सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2024 3:32 PM

Aashadh Special Gulachi Goad Poori: आषाढ महिन्यात मराठवाडा भागात तिखट- मिठाच्या पुऱ्या करण्यासोबतच गोड पुऱ्या करण्याची परंपरा आहे. या गोड पुऱ्या कशा करायच्या पाहा..(special sweet puri recipe in marathi).

ठळक मुद्देया गोड पुऱ्या ४ ते ५ दिवस अगदी छान टिकतात. त्यामुळे तुम्ही त्या प्रवासातही सोबत नेऊ शकता. 

आषाढ महिना म्हणजे घरोघरी तळणाचे कार्यक्रम होणार हे नक्की. या दिवसांत पाऊस असतो. त्यामुळे गरमागरम भजी, आषाढीनिमित्त चकल्या, पापड्या, चिप्स, साबुदाणा वडे असे तळणीचे पदार्थ आणि त्या मागोमाग गोड पुऱ्या, तिखट पुऱ्या असा आषाढ तळण्याचा कार्यक्रम. आषाढ महिन्यात मराठवाडा भागात तिखट पुऱ्या केल्या जातात आणि गूळ घालून गोड पुऱ्याही केल्या जातात (Aashadh special gulachi goad poori). या गोड पुऱ्या ४ ते ५ दिवस अगदी छान टिकतात. त्यामुळे तुम्ही त्या प्रवासातही सोबत नेऊ शकता. (how to make sweet poori using gud or jaggery). काही जणींनी केलेल्या गोड पुऱ्या खुपच वातड, कडक होतात. म्हणूनच आता ही रेसिपी पाहा. या पद्धतीने केलेल्या आषाढ स्पेशल गोड पुऱ्या अगदी छान खुसखुशीत होतील. (special sweet puri recipe in marathi).

आषाढ स्पेशल गोड पुऱ्या करण्याची रेसिपी

 

साहित्य

२ कप कणिक म्हणजेच गव्हाचे पीठ

१ ते दिड कप पाणी

Priyanka Chopra Birthday: प्रियांका चोप्राचा 'हा' संघर्ष कुणीच पाहिला नाही, त्यामुळेच तर ती आज.....

१ कप किसलेला गूळ

तळण्यासाठी तेल

कृती 

सगळ्यात आधी पाणी थोडं गरम करून घ्या आणि त्या पाण्यामध्ये गूळ टाका.

 

सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या जेणेकरून गूळ पाण्यात पुर्णपणे विरघळेल.

त्यानंतर या गुळाच्या गोड पाण्यात आता कणिक टाकून घट्ट मळून घ्या. हे मिश्रण थोडं घट्टच करावं. कणिक मळताना गुळाचं पाणी कमी पडल्यास साधं पाणी टाकलं तरी चालेल.

केस एवढे वाढतील आणि दाट होतील की विंचरण्याचाही कंटाळा येईल, बघा त्यासाठी काय करावं....

आता गॅसवर कढई गरम करायला ठेवा आणि तिच्यामध्ये तेल टाका. तेल चांगलं कडकडीत तापलं की नेहमीप्रमाणे पुऱ्या लाटून तळून घ्या. या पुऱ्या थोड्या जाडसर लाटाव्या. जेणेकरून त्या मऊ होतील. खूप पातळ पूरी लाटली तर ती कडक, वातड होऊ शकते. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.