Lokmat Sakhi >Food > उत्तपा खावासा वाटल्यास १० मिनिटांत करा, शाळेच्या डब्यासाठीही झटपट नाश्ता-मुलं म्हणतील दे उद्या पुन्हा!

उत्तपा खावासा वाटल्यास १० मिनिटांत करा, शाळेच्या डब्यासाठीही झटपट नाश्ता-मुलं म्हणतील दे उद्या पुन्हा!

Aata Uttapam Recipe: तुम्हाला कधीही उत्तपा खाण्याची इच्छा झाली तर अवघ्या १० मिनिटांत तयार होणारी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पाहा...(how to make uttapa from wheat aata?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2024 04:42 PM2024-10-16T16:42:38+5:302024-10-16T19:15:08+5:30

Aata Uttapam Recipe: तुम्हाला कधीही उत्तपा खाण्याची इच्छा झाली तर अवघ्या १० मिनिटांत तयार होणारी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पाहा...(how to make uttapa from wheat aata?)

aata uttapam recipe by kunal kapoor, how to make uttapa from wheat aata | उत्तपा खावासा वाटल्यास १० मिनिटांत करा, शाळेच्या डब्यासाठीही झटपट नाश्ता-मुलं म्हणतील दे उद्या पुन्हा!

उत्तपा खावासा वाटल्यास १० मिनिटांत करा, शाळेच्या डब्यासाठीही झटपट नाश्ता-मुलं म्हणतील दे उद्या पुन्हा!

Highlightsमुलांना डब्यात देण्यासाठी हा पदार्थ अतिशय उत्तम आहे. 

बऱ्याचदा आपल्याला उत्तपा खाण्याची इच्छा होते. पण उत्तपा, इडली, डोसा, अप्पे असा कोणताही दाक्षिणात्य पदार्थ खायचा म्हटला तर त्यासाठी बरीच आधी तयारी करून ठेवावी लागते. डाळ- तांदूळ भिजत घाला, मग ते मिक्सरमधून वाटून घ्या, काही तासांसाठी ते आंबवून घ्या.. असे बरेच सोपस्कार पार पाडल्यानंतर मग कुठे त्या पदार्थांचा आस्वाद घेता येतो. पण एवढी लांबलचक प्रक्रिया करण्याची इच्छा नसेल तर सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी सांगितलेली ही आटा उत्तपा रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पाहा (aata uttapam recipe by kunal kapoor). यामध्ये आपल्याला कणिक म्हणजेच गव्हाचे पीठ वापरून उत्तपा तयार करता येणार आहे.(how to make uttapa from wheat aata?)

आटा उत्तपा म्हणजेच कणकेचा उत्तपा करण्याची रेसिपी

 

साहित्य

२ वाट्या गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक

चवीनुसार मीठ

१ टीस्पून बेकिंग सोडा

१ बारीक चिरलेला टोमॅटो

अश्विनी पौर्णिमा: कणकेचे दिवे व्यवस्थित जमत नाहीत- तेल गळून जातं? परफेक्ट दिवे करण्यासाठी ५ टिप्स.. 

१ बारीक चिरलेला कांदा

२ टेबलस्पून कोथिंबीर

२ ते ३ टेबलस्पून तेल

कोजागरी पौर्णिमेला दुधासोबत काहीतरी चटपटीत पदार्थ करायचे म्हणता? घ्या ५ टिप्स, दुधाचा आनंद वाढेल

फोडणीसाठी मोहरी, जिरे, हिंग, कडिपत्ता.

१ टीस्पून बारीक वाटलेला लसूण 

एका हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे.

 

कृती

सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये कणिक घ्या. त्यामध्ये मीठ, तिखट, बेकिंग सोडा टाकून ती उतप्पाचे पीठ असते तशी पातळ कालवून घ्या.

गॅसवर लहान कढई गरम करायला ठेवा. त्यात तेल टाकून फोडणी करून घ्या. त्यातच लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडेही टाका. आता ही खमंग, कडकडीत फोडणी भिजवलेल्या गव्हाच्या पिठात घाला.

जुन्या भरजरी साड्या वापरून कंटाळा आला? दिवाळीत त्याच साड्यांपासून मुलींसाठी शिवा ७ सुंदर पॅटर्नचे ड्रेस

यानंतर गॅसवर तवा गरम करायला ठेवा. तवा तापला की त्यावर थोडं तेल सोडून जाडसर उत्तपा टाका. उतप्पावर वरच्या बाजुने कांदा, टोमॅटो, काेथिंबीर घाला. यानंतर खालच्या बाजुने उत्तपा खमंग भाजला गेला की त्यावर तेल सोडा आणि तो दुसऱ्या बाजुनेही खमंग भाजून घ्या. 

हा गरमागरम उत्तपा तुम्ही सॉस, लोणचं किंवा नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता.

मुलांना डब्यात देण्यासाठीही हा पदार्थ अतिशय उत्तम आहे. 


 

Web Title: aata uttapam recipe by kunal kapoor, how to make uttapa from wheat aata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.