लोणचं, चटणी, कोशिंबीर अशा साईड डिशेस जेवणात असल्याशिवाय जेवणाची काही मजाच नाही. त्यामुळे अगदी थोडे थोडे का होईना, पण हे पदार्थ आपल्या ताटात पाहिजेच असतात. आता कैरीचं, लिंबाचं लोणचं आपण नेहमीच खातो. पण सध्या हिवाळ्यात गाजर, मुळा, आवळा बाजारात भरपूर प्रमाणात येतात. त्यामुळे या भाज्यांची लोणचीही घातली पाहिजेत आणि खाल्ली पाहिजेत. खासकरून तर आवळ्याचं लोणचं अजिबातच चुकवू नये असं आहे. कारण आवळ्यामध्ये आरोग्याच्या दृष्टीने अनेक पौष्टिक घटक असतात. आणि एरवी वर्षभर आवळा मिळत नाही (Amle ka aachar recipe). त्यामुळे सध्या हंगाम आहे तर आवळ्याचं लोणचं करून ठेवा (How to make gooseberry pickle) आणि दररोज थोडं थोडं खा. बघा आवळ्याच्या लोणच्याची ही सोपी रेसिपी....(Aavla loncha recipe in marathi)
आवळ्याच्या लोणच्याची सोपी रेसिपी
साहित्य
१ चमचा मोहरी
१ चमचा जिरे
१ चमचा धणे
फक्त १० मिनिटांत होणारे बिनापाकाचे तिळाचे लाडू, चवदार लाडूंची झटपट होणारी रेसिपी
अर्धा चमचा मेथी दाणे
पाव कप तेल
१ कप आवळ्याचे काप
चवीनुसार लाल तिखट
चवीनुसार मीठ
कृती
सगळ्यात आधी आवळे धुवून पुसून कोरडे करून घ्या. त्यानंतर त्याचे लोणच्यासाठी काप करून घ्या.
यानंतर जीरे, धने आणि मोहरी मध्यम आचेवर एखादा मिनिट भाजून घ्या. यानंतर गॅस बंद करा आणि गरम तव्यावर मेथ्याचे दाणे टाकून ते भाजून घ्या. थंड झाल्यानंतर मोहरी, जिरे, धणे, मेथी दाणे मिक्सरमध्ये टाकून त्याची रवाळ पावडर करून घ्या.
आता कढईमध्ये तेल गरम करा. त्या तेलात आवळ्याचे काप टाकून २ ते ३ मिनिटे परतून घ्या. आवळ्याचा रंग थोडासा सोनेरी झाला की गॅस बंद करा.
तेलात टाकलेले आवळे थोडे थंड झालं की त्यामध्येच आपण तयार केलेला लोणचे मसाला, मीठ आणि तिखट टाकून सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घ्या. आवळ्याचं लोणचं झालं तयार.
हे लोणचं स्वच्छ धुवून कोरड्या केलेल्या काचेच्या बरणीत भरून ठेवा.