Join us  

उन्हाळ्यात प्या कुळथाचे कळण, अस्सल कोकणी पदार्थ, ऋजुता दिवेकर सांगते ऊन बाधणार नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2023 6:49 PM

Kulith Kalan Recipe: How To Make This Dal-Based Drink For Healthy Diet : उन्हाळ्यात कुळीथ कळण फक्त आपल्या शरीराला थंडावाच देत नाहीत तर इतर अनेक आरोग्यदायी फायदे देऊ शकते....

उन्हाळ्यात हायड्रेटेट राहणे किती महत्वाचे असते हे आपल्या सगळ्यांनाच माहित असते. उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेटेट ठेवण्यासाठी आपण भरपूर पाणी, फळांचे रस, सरबत, रसदार फळ असे अनेक पदार्थ खाण्यावर जास्त भर देतो. सध्या उन्हाळ्याच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. अशा कडक उन्हाळ्यामध्ये आपले शरीर  हायड्रेटेड राहणे देखील गरजेचे असते. यासाठी आपल्या शरीरामध्ये पुरेशा प्रमाणात पाणी असणे आवश्यक असते. पाण्यामुळे आपल्या शरीरातील उर्जेची पातळी नियंत्रित राहते. उन्हाळ्यामध्ये आपले शरीर हायड्रेटेट ठेवणे जरा अवघड असू शकते, कारण पाण्याची पातळी आपल्या शरीरामध्ये काही मर्यादेपर्यंत ठेवणे कठीण जाऊ शकते. परंतु, आपण पाण्याच्या व्यतिरिक्त दुसरी फळे, फळभाजी किंवा पेयं वापरु शकता की ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याचा साठा हा योग्य प्रमाणात ठेवण्यास मदत होते.

वाढत्या गरम्यामुळे आणि उष्णतेमुळे आपल्या शरीरातील ऊर्जा कमी होते. ज्यामुळे आपल्याला लवकर थकवा जाणवू लागतो. हाच थकवा जर जास्त झाला तर आपण आजारी देखील पडण्याची शक्यता असते. काहीवेळा वाढत्या उष्णतेमुळे आपले शरीर डिहायड्रेटेट होते. अशावेळी आपण साखरेचे प्रमाण जास्त असलेले कोल्ड्रिंक्स किंवा आर्टिफिशीयल शीतपेय पितो. असे आर्टिफिशीयल शीतपेय व कोल्ड्रिंक्स पिऊन शरीराचं जास्त नुकसान होत. या पेयांमध्ये शून्य पोषक तत्वे असतात आणि यामुळे आपण आपल्या आहारात भरपूर नको असलेल्या कॅलरीज समाविष्ट करतो. नुकतेच सुप्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी एक अनोखे पेय त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केले आहे. जे उन्हाळ्यात फक्त आपल्याला थंडावाच देत नाहीत तर इतर अनेक आरोग्यदायी फायदे देऊ शकतात(About Kulith Kalan Recipe: How to make this lentil based drink for a healthy diet).

कुळीथ कळण नेमके बनवायचे कसे ?

साहित्य :- 

१. कुळीथ पाणी - १ कप २. ताक - १/२ कप ३. तूप - १ टेबलस्पून ४. जिरे -  १ टेबलस्पून ५. हिंग - चिमूटभर ६. मीठ - चवीनुसार ७. साखर - १ टेबलस्पून ८. हिरव्या मिरच्या - १ टेबलस्पून (बारीक चिरुन घेतलेल्या)

वजन कमी करण्याचा ५० - ३५ - १५ फॉर्म्युला, ऋजुता दिवेकर सांगतात लठ्ठपणा कमी करण्याची खास ट्रिक...

जास्वंद-मोगरा घालून केलेलं तेल लावा, विसरा केसाच्या समस्या! ऋजुता दिवेकरच्या आईने शेअर केला खास उपाय...

कृती :- 

१. शिजवलेल्या कुळीथाचा वरचा पाण्याचा भाग घ्या आणि थंड होऊ द्या. २. त्यात ताक, मिरच्या, मीठ, चिमूटभर साखर घालावी. ३. तुपात भाजलेले जिरे आणि हिंग टाकून घ्यावे. ४. त्यानंतर हे मिश्रण मंद आचेवर हलकेच गरम करुन घ्यावे. (गॅस मोठा करुन उकळवू नये. किमान ५० अंश सेल्सिअस तापमानावर हलकेच गरम करुन घ्यावे.)

बैठ्या जीवनशैलीने वाढलेलं वजन आणि ब्लडप्रेशर कमी करायचंय? ८ सोप्या टिप्स, गोळी न घेता जगा...

कुळीथ कळण पिण्याचे फायदे :- 

१. या पेयामुळे शरीराला आरोग्यदायी फायदे मिळतात. कुळीथ कळण हे ताक, कुळीथ आणि मसाल्यांनी बनवलेले पेय आहे. कळण पारंपारिकपणे उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी प्यायले जाते.

२. ऋजुता दिवेकर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलेआहे की, रात्री जेवण घेण्यास उशीर झाला तर त्याऐवजी आपण हे पेय घेऊ शकता.

३. हे पेय पौष्टिक दाट असून पोटासाठी व पचनाकरता हलके असते. 

४. हे पेय अमीनो ऍसिड, पॉलिफेनॉल आणि चांगले बॅक्टेरियांनीयुक्त असे पेय आहे. 

५. न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर म्हणते की, हे पेय मुरुमांच्या खुणा, शरीरातील मरगळ, कुरळे केस, पिगमेंटेड त्वचा आणि मूड स्विंग्सपासून मुक्ती मिळवून देण्यास मदत करू शकते.

६. हे पेय प्यायल्याने शरीराला सूज येणे, त्वचेची जळजळ आणि निद्रानाश यापासून मुक्ती मिळू शकते.

टॅग्स :अन्न