Lokmat Sakhi >Food > कुकरमध्ये डाळ शिजवता की पातेल्यात? डाळीतलं प्रोटीन पुरेपूर मिळण्यासाठी; ICMR चा खास सल्ला

कुकरमध्ये डाळ शिजवता की पातेल्यात? डाळीतलं प्रोटीन पुरेपूर मिळण्यासाठी; ICMR चा खास सल्ला

Right Way To Cook Dal : अनेकदा डाळ उकळल्यानंतर दाणे कच्चे राहतात. किती शिट्ट्या घेऊन उकळवलं तरी डाळ शिजत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 08:28 PM2024-06-04T20:28:39+5:302024-06-04T20:34:48+5:30

Right Way To Cook Dal : अनेकदा डाळ उकळल्यानंतर दाणे कच्चे राहतात. किती शिट्ट्या घेऊन उकळवलं तरी डाळ शिजत नाही.

According To Icmr Right And Wrong Way too Cool Lentils To Get Maxium Benefits | कुकरमध्ये डाळ शिजवता की पातेल्यात? डाळीतलं प्रोटीन पुरेपूर मिळण्यासाठी; ICMR चा खास सल्ला

कुकरमध्ये डाळ शिजवता की पातेल्यात? डाळीतलं प्रोटीन पुरेपूर मिळण्यासाठी; ICMR चा खास सल्ला

 डाळ भारतीय आहाराचा एक महत्वाचा भाग आहे. पोषक  तत्वांनी परिपूर्ण असलेली डाळ वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. (Cooking Hacks) काही लोक डाळ शिजवण्याआधी भिजवतात तर काहीजण लगेच  कुकरमध्ये  उकळवायला ठेवतात. ज्यामुळे डाळ घट्ट होते तर कधी जास्त पातळ होते. (According To Icmr Right And Wrong Way too Cool Lentils To Get Maxium Benefits)

अनेकदा डाळ उकळल्यानंतर दाणे कच्चे राहतात. कितीही शिट्ट्या घेऊन उकळवलं तरी डाळ शिजत नाही. आयसीएमआरने अलिकडेच खाण्यापिण्यासंबंधित काही गाईडलाईन्स शेअर केल्या आहेत. यात असं सांगितले गेले आहे की  स्वंयपाक करण्याच्या पद्धतीचा त्याचा दर्जावर परिणाम होतो.  डाळ चुकीच्या पद्धतीने शिजवल्यास त्यातील पोषक तत्व नष्ट होतात.

डाळ बनवण्याची योग्य पद्धत

सुरूवातीच्याकाळी लोक मातीच्या किंवा खोल भांड्यात डाळ बनवायचे. आजही बरेच लोक हा मार्ग अवलंबतात. आईसीएमआरच्या रिपोर्टनुसार डाळ शिजवण्यासाठी बॉयलिंग आणि प्रेशर कुकींग डाळीची गुणवत्ता टिकवून ठेवणं महत्वाचे असते.  या २ पद्धतीने फायटीक एसिड कमी होते. फायटीक एसिड कॅल्शियम, मॅग्नेशियमचा,  जिंक आणि आयर्न सारख्या मिनरल्सचे अवशोषण होण्यास मदत होते. 

डाळ जास्त उकळू नका

लोक रोजच्या जेवणात डाळ करतात पण डाळीला चव  नसते ना डाळ हेल्दी असते. म्हणून डाळी ओव्हर बॉईल करणं टाळायला हवं. जास्त उकळल्यामुळे यातील प्रोटीन क्वालिटी खराब होण्याची शक्यता असते. 

डाळ उकळवण्याची योग्य पद्धत कोणती (Which Is Right Way To Cook Dal)

अनेकदा लोकांची तक्रार असते की डाळीत जास्त पाणी झालं किंवा डाळ सुकी राहिली. आयसीएमआरच्या गाईडलाईन्सनुसार  डाळ उकळवताना योग्य प्रमाणात पाणी घाला. इतकंच पाणी घाला की  डाळ व्यवस्थित भिजली जाईल.   यामुळे डाळ शिजवताना कुकरमधून पाणी बाहेर येणार नाही आणि पोषक तत्वही टिकून राहतील.

प्रोटीनसाठी महागड्या गोेष्टी परवडत नाहीत? फक्त १० रुपयांत खा ३ प्रोटीन पदार्थ- हाडं होतील बळकट

डाळ जास्त उकळल्यामुळे काय होते?

डाळ जास्त उकळवल्यामुळे त्यातील प्रोटीन्सची गुणवत्ता कमी होते. डाळ ओव्हर बॉईल केल्यामुळे त्यातील व्हिटामीन बी आणि सी नष्ट होते. डाळीची न्युट्रिशनल वॅल्यू कमी होते. डाळ जास्त शिजवल्यामुळे न्युट्रिशनल वॅल्यू  कमी होते. चव बदलते.  ओव्हर कुक केल्याने  डाळीची चव बदलते. ओव्हर बॉईल केल्याने त्यातील पोषक तत्व बाहेर निघतात. ज्यामुळे डाळीतील पोषक तत्वांचे प्रमाण कमी होते. 

केस पातळ झाले, कंगव्यात अडकतात? अर्धा चमचा मेथीचा खास उपाय, लांब-दाट होतील केस

डाळ कितीवेळ उकळवावी?

आयसीएमआरच्या सल्ल्यानुसार डाळ जोपर्यंत नरम होणार नाही तोपर्यंत शिजवा. डाळ आणि मटार २० ते ३० मिनिटं शिजवा,   शेंगा आणि चणे ६० ते ९० मिनिटं शिजवा, प्रेशर कुकर डाळ आणि मटारचे जाणे ५ ते १० मिनिटं शिजवा, शेंगा आणि बिया, चणे १५ ते २५ मिनिटं शिजवा. एक कप सुकी डाळ उकळवण्यासाठी ३ ते ४ कप पाण्याचा वापर करा. प्रेशर कुकरसाठी एक कप सुकी डाळ बनवण्यासाठी ३ ते ४ कप पाण्याचा वापर करा. प्रेशर कुकरमध्ये २ ते ३ कप पाण्याचा वापर करा.

Web Title: According To Icmr Right And Wrong Way too Cool Lentils To Get Maxium Benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.