Curd Reduce Cancer Risk : दही खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. कारण यात प्रोबायटीक्ससोबतच प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटॅमिन्स अससतात. दह्यातील गुड बॅक्टेरियांना प्रोबायोटिक्स म्हटलं जातं. जे पचन तंत्र मजबूत ठेवतात. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, दही खाल्ल्यानं कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका कमी होतो. मास जनरल ब्रिघमच्या संशोधकांनी केलेल्या रिसर्चमध्ये असं आढळून आलं की, जे लोक आठवड्यातून कमीत कमी एक ते दोनदा दही खातात त्या लोकांमध्ये बिफीडोबॅक्टीरिअम पॉझिटिव ट्यूमर होण्याचा धोका केवळ २० टक्क्यांपेक्षाही कमी असतो.
या रिसर्चमध्ये १ लाखांहून अधिक महिला आणि ५१ हजार पुरूषांच्या खाण्या-पिण्याचा अभ्यास करण्यात आला. यातील ३०७९ लोकांना कोलोरेक्टल कॅन्सर झाला. रिसर्चमधून आढळून आलं की, जे लोक नियमितपणे दही खातात त्यांच्यात कॅन्सरचा धोका २० टक्क्यांपेक्षा कमी होता.
कोलोरेक्टल कॅन्सर म्हणजेच आतड्यांचा कॅन्सर जगभरातील लोकांना होणारा तिसरा सगळ्यात मोठा कॅन्सर आहेत. WHO च्या एका आकडेवारीनुसार, दर १० पैकी १ कॅन्सरची केस यासंबंधीच असते.
आतड्यांच्या कॅन्सरची कारणं
आतड्यांचा कॅन्सर वेगवेगळ्या कारणांनी होतो, जसे की, जास्तवेळ एकाच जागी बसून काम करणे, धुम्रपान, मद्यसेवन, प्रोसेस्ड फूड आणि रेड मीट अधिक खाणं, लठ्ठपणा आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी.
दह्यानं कॅन्सरचा धोका कसा कमी होतो?
दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. संशोधकांना याचं नेमचं कारण समजू शकलेलं नाही की, दही कशाप्रकारे कॅन्सरचा धोका कमी करतं. मात्र, वैज्ञानिकांनी हे मान्य केलं की, दही आतड्यांच्या मायक्रोबायोमला चांगलं बनवतं.
दही खाण्याचे फायदे
दह्यामध्ये कॅल्शिअम, प्रोटीन, पोटॅशिअम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी २, व्हिटॅमिन बी १२ सहीत अनेक पोषक तत्व आढळतात. नियमितपणे दही खाल्ल्यास हाडं मजबूत होतात. दही नेहमीच साखर न टाकता, मीठ न टाकता खावं. यामुळे डायबिटीसही कंट्रोल राहतो. तसेच नेहमीच दही खाल्ल्यानं हृदयासंबंधी आजारांचा धोकाही कमी होतो.