Join us  

अक्षयकुमारला खूप आवडतो 'हा' सुपरहेल्दी पदार्थ, मुलांना डब्यात देण्यासाठीही उत्तम, बघा रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2024 10:28 AM

Actor Akshay Kumar's Favorite Beet Root Tikki: शाळा सुरू होत आहेत. त्यामुळे आता डब्यात काय द्यायचं हा प्रश्न पुन्हा प्रत्येक आईला पडणार.. त्यासाठीच बघा अक्षयकुमारच्या आवडीचा हा खास पदार्थ... (beet root tikki recipe)

ठळक मुद्देत्याच्या आवडीच्या पदार्थांपैकी एक असणारा हा पदार्थ मुलांना डब्यात देण्यासाठीही अतिशय पौष्टिक आणि चवदार आहे.

बॉलीवूड अभिनेता अक्षयकुमार हा त्याच्या साध्या राहणीसाठी प्रसिद्ध आहे. तो कधीही कोणत्या लेटनाईट पार्टीत दिसत नाही. कोणत्याही व्यसनांपासून तो नेहमीच चार हात दूर राहतो. त्याच्या डाएटबद्दल आणि झाेपण्याच्या वेळांबद्दलही तो अतिशय काटेकाेर असतो. घरचं साधं अन्न हा त्याचा नेहमीचा आहार. म्हणूनच तर सेटवर असतानाही तो शक्य असेल तिथे त्याचा घरचा डबा घेऊन जातो (actor akshay kumar's favorite breakfast). सध्या त्याचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत असून यामध्ये त्याने त्याच्या आवडीच्या बीटरुट टिक्कीबाबत माहिती दिली आहे (beet root tikki recipe). त्याच्या आवडीच्या पदार्थांपैकी एक असणारा हा पदार्थ मुलांना डब्यात देण्यासाठीही अतिशय पौष्टिक आणि चवदार आहे (perfect recipe for school tiffin). बघा त्याची ही खास रेसिपी... (how to make beet root tikki)

 

बीटरुट टिक्की रेसिपी

साहित्य 

१ मध्यम आकाराचं बीट

१ मध्यम आकाराचा बटाटा

अर्धा कप किसलेलं चीज

जगातली सगळ्यात 'Jealous woman', नवऱ्याची दररोज घेते लाय डिटेक्टर टेस्ट, बघा आणखी काय करते... 

अर्धा कप बारीक चिरलेला कांदा आणि थोडी कोथिंबीर

अर्धा कप बेसनपीठ

१ टीस्पून आलं- लसूण, मिरची पेस्ट

प्रवासात ३ पदार्थ कायम सोबत ठेवा- लहान मुलांसाठीही उत्तम, अजिबात थकवा येणार नाही

१ टीस्पून धने- जिरेपूड

चवीनुसार मीठ

शॅलोफ्राय करण्यासाठी तेल 

 

कृती

१. सगळ्यात आधी बीट रुट आणि बटाटा उकडून ते मॅश करून घ्या.

२. त्यानंतर एका भांड्यात बीटरुट, बटाटा, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, बेसनपीठ, धने- जिरेपूड, आलं- लसूण पेस्ट, मीठ असं सगळं टाका आणि सगळं मिश्रण एकत्र कालवून घ्या.

वजन कमी करण्यासाठी आठवड्यातून किती दिवस, कोणता व्यायाम करावा? बघा तज्ज्ञांनी दिलेला सल्ला

३. यानंतर या मिश्रणाच्या लहान लहान गोलाकार टिक्की तयार करा.

४. गॅसवर तवा गरम करायला ठेवा. तवा गरम झाला की त्याला थोडं तेल लावून घ्या. नंतर त्यावर आपण तयार केलेल्या टिक्की ठेवा आणि वरतून पुन्हा थोडं तेल सोडा. त्यावर एखादा मिनिट झाकण ठेवून वाफ येऊ द्या. 

५. यानंतर टिक्कीची वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर करून थोडं तेल लावून दोन्ही बाजुंनी टिक्की खमंग भाजून घ्या.

६. दही, सॉस, लोणचं यासोबत खायला ही टिक्की अतिशय उत्तम लागेल. 

{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/978713663610840/}}}}

 

टॅग्स :Shalechi Taiyariपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अक्षय कुमारअन्न