डोसा हा पदार्थ दक्षिण भारतातला असला तरी आता अख्खा भारतभर तो लोकप्रिय झालेला आहे. भारतात कुठेही फिरायला गेलात, तरी तिथे डोसा किंवा मसाला डोसा किंवा डोस्याचे आणखी वेगवेगळे प्रकार तुम्हाला नक्कीच खायला मिळताता. एवढंच नाही तर आता भारताबाहेर परदेशातही काही ठिकाणी डोसा मिळू लागला आहे. कारण भारतीयांप्रमाणेच परदेशी खवय्यांनाही या डोस्याने वेड लावले आहे. साधा डोसा (first dosa) हा खवय्यांसाठी अगदीच अळणी. तर मसाला डोसा (first masala dosa) हा एकदम चमचमीत. त्यामुळे मसाला डोस्याला खवय्यांकडून मिळणारे प्रेमही थोडे जास्तच.. या दोन डोस्यांच्या जन्माविषयीचाच एक भन्नाट शोध अभिनेता आर. माधवन (Actor R. Madhavan) याने लावला आहे.
डोस्याच्या जन्माविषयी माहिती देणारी एक स्टोरी आर. माधवन याने सोशल मिडियावर शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये त्याने लावलेलं लॉजिक जरा मजेशीर वाटत असलं तरी बऱ्याच प्रमाणात खरं ठरू शकतं.
हजार रुपयांचं फेशियल करा फक्त १० रुपयांत, बघा कसं करायचं इंस्टंट ग्लो देणारं ब्रायडल फेशियल
या स्टोरीमध्ये तो असं म्हणतो आहे की भारतात बटाटा हा १६ व्या शतकात आला. त्यापुर्वी भारतीयांना बटाटा माहिती नव्हता. त्यामुळे साहजिकच त्याच्यानंतरच बटाट्याचे कोणतेही पदार्थ आपल्याकडे आले...
पण डोसा या पदार्थाची जी काही माहिती लिखित स्वरुपात आपल्याकडे उपलब्ध आहे, त्यानुसार ८ व्या शतकातच आपल्याकडे डोसा केला जाऊ लागला.
पती-मुलं गमावल्याचं दु:ख मोठं होतं! - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि स्मृती इराणी यांचा खास संवाद
म्हणजेच बटाट्याचा शोध लागण्याच्या ८०० वर्षे आधीपासूनच आपल्याकडे डोसा बनवला जात होता. आता बटाटा येऊन मसाला डोसाचा शोध लागेपर्यंत काही वर्षे नक्कीच गॅप गेला असणार. त्यामुळे साधा डोसा आणि मसाला डोसा यांच्यामध्ये नक्कीच ८०० वर्षांपेक्षा अधिक काळाचा गॅप आहे... आहे की नाही दिमाग की बत्ती जलानेवाला हा एक भन्नाट शोध..