गृहिणी असो की अभिनेत्री... स्वयंपाक घरात जाऊन आपल्या माणसांसाठी काहीतरी करावं, असं कधी ना कधी प्रत्येकीला वाटतंच.. आपल्या अनुष्का शर्मालाही काही दिवसांपुर्वी असंच वाटलं होतं.. लॉकडाऊनमध्ये (corona lockdown) बऱ्याच मैत्रिणींनी आपापल्या स्वयंपाक घरात कुकींग प्रयोग केले... रेसिपी बघायची आणि लगेच करून पहायची, हा सपाटाच अनेकींनी लावला होता. अनुष्कानेही (tomato jam recipe by Actress Anushka Sharma) असंच काहीसं केलं होतं, हे तिनं नुकतंच सांगितलं आहे..
अनुष्काने तिचा एक व्हिडिओ नुकताच इन्स्टाग्रामवर (Anushka Sharma's instagram video) शेअर केला आहे... हा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला की अवघ्या ४- ५ तासांतच या व्हिडिओला तब्बल १० लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओमध्ये अनुष्का चक्क टोमॅटो जॅम बनविताना दिसली आहे. आता टोमॅटो सॉस तर आपण ऐकला आहे, पण तिने जो पदार्थ बनविला त्याला ती टोमॅटो जॅम म्हणते आहे. या व्हिडिओसोबत तिने एक पोस्ट शेअर केली आहे. यात ती म्हणते की २०२० मध्ये लॉकडाऊन असताना मी अनेक फूड ब्लॉग पाहिले आणि तेव्हाच हा टोमॅटो जॅम मेकिंग व्हिडिओ करायचा हे ठरवलं होतं...
जे ठरवलं ते तिने केलं आणि टोमॅटो जॅम कसा बनवायचा याचा एक मस्त व्हिडिओ बनवला. टोमॅटो सॉस तर कदाचित तुम्हीही करून बघितला असेल. पण आता जर तुम्हाला अनुष्कासारखा टोमॅटो जॅम बनवून पहायचा असेल, तर तिचा हा व्हिडिओ नक्की बघा.. यात तिने पुर्ण रेसिपी दाखवली आहे..
असा बनवला अनुष्काने टोमॅटो जॅम..
१. सगळ्यात आधी तर अनुष्काने १५- २० टोमॅटो घेतले, ते स्वच्छ धुतले.
२. यानंतर तिने सगळ्या टोमॅटोंना चाकूने छोटा छेद दिला आणि ते उकळत्या पाण्यात टाकून उकडून घेतले.
३. टोमॅटो उकडल्यानंतर तिने ते उकळत्या पाण्यातून बाहेर काढले. ते थंड होऊ दिले आणि त्यानंतर टोमॅटोची साले काढून घेतली.
४. साल काढलेले टोमॅटो तिने चिरून घेतले.
५. एक कढई गॅसवर तापत ठेवली. त्यामध्ये चिरलेले टोमॅटो टाकले. साखर, गुळ आणि आणखी एक पदार्थ तिच्या प्लेटमध्ये दिसत होता. हे सगळे पदार्थ तिने त्यात टाकले. सगळे मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये लिंबू पिळले.
६. अशा पद्धतीने बनविलेला टोमॅटो जॅम तिने ब्रेडला लावून तिच्या कुटूंबियांना खायला दिला..
७. अनुष्काने बनविलेला टोमॅटो जॅम चांगलाच चवदार झाला असावा, असे जॅम खाल्ल्यानंतर तिच्या कुटूंबियांच्या चेहऱ्यावरून तरी वाटते.