ठेचा हा महाराष्ट्रीयन लोकांचा अगदी आवडीचा पदार्थ खा. मग तुम्ही भात खा, पोळी खा किंवा भाकरी खा. कोणत्याही प्रकारचं जेवण असलं तरी तोंडी लावायला थोडासा ठेचा मिळाला तर जेवण मस्त झणझणीत होऊन जातं. ठेचा करण्याची प्रत्येक प्रांताची रेसिपी वेगवेगळी आहे. कोणी शेंगदाणे घालून मिरचीचा तिखटपणा कमी करण्याचा प्रयत्न करतं ( how to make thecha by adding kairi). तर कोणी लिंबू पिळून ठेच्याला छान आंबट- तिखट चव देतं (thecha recipe using kairi or raw mango). मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री हिने ठेचा करण्याची एक खास पद्धत सांगितली आहे. या तिच्या उन्हाळा स्पेशल रेसिपीमध्ये तिने कैरी घालून ठेचा केला आहे. (Actress bhagyashree shared summer special maharashtrian thecha recipe)
कैरीचा ठेचा करण्याची रेसिपी
साहित्य
८ ते १० हिरव्या मिरच्या
अर्धी वाटी शेंगदाणे
लसूणाच्या ८ ते १० पाकळ्या
Summer Special: कॉटन- लिनन साड्यांमध्ये कसा करायचा आकर्षक लूक? बॉलीवूड अभिनेत्रींकडून घ्या खास टिप्स
१ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
अर्धी कैरी
चवीनुसार मीठ
अर्धा टेबलस्पून तेल
कृती
सगळ्यात आधी एका कढईमध्ये तेल टाकून शेंगदाणे, मिरच्या आणि लसूण परतून घ्या.
कॉटनचे कपडे धुतल्यानंतर आकसतात? करून बघा १ खास उपाय- सिल्क साड्यांसाठीही उपयुक्त
कैरीचे साल काढून बारीक फोडी करून घ्या.
परतून थंड झालेले शेंगदाणे, मिरच्या आणि लसूण मिक्सरच्या भांड्यात टाका. त्यातच कैरीचे काप आणि चवीनुसार मीठ घाला. सगळं मिश्रण छान बारीक वाटून घेतलं की झाला कैरीचा आंबट- तिखट चवीचा ठेचा तयार.