काही खाद्यपदार्थ म्हणजे पक्के डेडली कॉम्बिनेशन्स असतात. असे पदार्थ म्हणजे खवय्यांसाठी पर्वणीच. म्हणजे जसं की गुलाबजाम आणि आईस्क्रिम, केक आणि आईस्क्रिम.. तसंच एक जबरदस्त हीट कॉम्बिनेशन म्हणजे रबडी जिलेबी (Rabdi jalebi Indian dessert recipe in marathi). खरं पाहिलं तर हे दोन्ही पदार्थ वेगळे आणि वेगवेगळे, स्वतंत्र खाल्ले तरी त्याची चव खाणाऱ्यांनी रसनातृप्ती करते, हे निश्चित. पण तरीही जेव्हा हे दोन पदार्थ एकत्र करून खाल्ले जातात, तेव्हा त्याची चव अफलातून ठरते.
त्यात रबडी आणि जिलेबी (rabdi recipe within half hour) म्हणजे खास थंडीस्पेशल पदार्थ. फिटनेस फ्रिक आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत अतिशय कॉन्शस असलेली अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Actress Shilpa Shetty) हीने नुकताच रबडी जिलेबी या पदार्थावर यथेच्छ ताव मारला आहे. तिने या बाबतचा व्हिडियो नुकताच इन्स्टाग्रामला (instagram) शेअर केला असून हा तिचा व्हिडियो पाहून एखाद्याला रबडी जिलेबी खाण्याची इच्छा नाही झाली तरच नवल. शिल्पा शेट्टी सध्या व्हॅकेशनवर असून ती मसुरीला गेली आहे. तिने जी पोस्ट शेअर केली आहे, त्यात ती म्हणते की मसुरीला सध्या ८ डिग्री सेल्सियस एवढं तापमान असून या थंड वातावरणात गरमागरम जिलेबी आणि रबडी खाण्याचं सूख वेगळंच...
शिल्पाचं (Actress Shilpa Shetty) बघून तुम्हालाही रबडी जिलेबी खाण्याची इच्छा होत असेल किंवा लवकरच येणाऱ्या थर्टीफर्स्ट पार्टीसाठी तुम्ही गोड पदार्थ काय करावा, याचा विचार करत असाल तर रबडी बनविण्याची ही घ्या सोपी आणि झटपट होणारी रेसिपी. अर्ध्या तासात तुमची झकास रबडी तयार. बाहेरून गरमागरम जिलेबी विकत आणली की झाला तुमचा रबडी जिलेबी हा चवदार पदार्थ तयार.. या रबडी रेसिपीची खासियत म्हणजे यामध्ये दूध उकळत ठेवून ते कधी आळून येईल, कधी घट्ट होईल, याची वाट बघत बसण्याची मुळीच गरज नाही. अर्ध्या तासात छान घट्ट रबडी तयार होते.
इन्स्टंट रबडी करण्यासाठी लागणारं साहित्य
Ingredients for instant rabdi
अर्धा लिटर दूध, अर्धा कप साखर, दोन टेबलस्पून कणिक, दोन टेबलस्पून मिल्क पावडर, दोन टेबलस्पून बदामाचे काप, अर्धा टीस्पून विलायची पावडर, दोन टेबलस्पून केशर दूध.
कशी करायची इन्स्टंट रबडी
How to make instant rabdi
- रबडी तयार करण्यासाठी सगळ्यात आधी गॅसवर दूध उकळत ठेवा.
- गॅस मोठा करा. दूध वारंवार हलवत रहा, जेणेकरून ते उतू जाणार नाही.
- यानंतर एका बाऊलमध्ये कणिक आणि मिल्क पावडर टाका. त्यात थोड दूध टाकून त्याची सैलसर पेस्ट तयार करून घ्या.
Video credit- VARSHA BHAWSAR'S RECIPES
- असं करताना या पिठात कुठेही गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या.
- आता हे कालवलेलं पीठ आपल्या उकळत्या दूधात हळू हळू टाका.
- टाकताना एका बाजूने पीठ हलवत रहा, जेणेकरून पिठाच्या गाठी तयार होणार नाहीत.
- यानंतर साधारण १० ते १५ मिनिटात दूध चांगले आटले जाईल.
- दूध आटले की त्यात साखर, विलायची पूड, केशर दूध टाका आणि पुन्हा एकदा ते उकळू द्या.
- दूध आटले आणि गॅस बंद केला की त्यात बदामाचे काप टाका.
- थंड झाली की घट्ट रबडी झाली तयार..