Join us  

सोनाली कुलकर्णीने केली सासरच्यांसाठी तांदुळाची खीर, फोटो व्हायरल; तांदुळाच्या खिरीची घ्या स्पेशल रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2022 4:56 PM

Social Viral: मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची (Actress Sonali Kulkarni) एक पोस्ट जबरदस्त व्हायरल झाली आहे... तिने केलेला पदार्थ (tandalachi kheer) आणि त्यासोबतच घेतलेला उखाणा सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय झाला आहे.

ठळक मुद्देतिने सध्या तिच्या सासरच्यांसाठी जे काही केलंय ते पाहून तिला ''अश्शी सून सुरेख सुगरण बाई...'' अशा अर्थाच्या कमेंट्स येत आहेत.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नाला एक वर्ष होऊन गेलं.. पण लॉकडाऊनमुळे ती आणि तिच्या सासरची मंडळी भेटू शकली नव्हती. आता भेटच नाही, म्हटल्यावर त्यांच्यासाठी काही करून त्यांना जेवू खावू घालण्याचा प्रश्नच नव्हता. पण आता मात्र सोनालीने ( (Actress Sonali Kulkarni) ) ही कसर पुरेपूर भरून काढली आहे. तिने सध्या तिच्या सासरच्यांसाठी जे काही केलंय ते पाहून तिला ''अश्शी सून सुरेख सुगरण बाई...'' अशा अर्थाच्या कमेंट्स येत आहेत. सोनाली सध्या तिच्या सासरी लंडन येथे आहे. तिने तिचा एक फोटो नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर (instagram share) केला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे. (tandalachi kheer recipe)

 

या फोटोमध्ये सोनालीच्या हातात एक ट्रे असून त्यामध्ये तांदळाच्या खिरीने (how to make tandalachi kheer?) भरलेल्या नऊ वाट्या आहेत. याविषयी सांगताना सोनाली म्हणतेय की तिने तिच्या सासरच्यांसाठी सासरच्या घरी केलेला हा पहिलाच पदार्थ आहे. या फोटोमध्ये सोनालीच्या कपाळावर ठसठशीत कुंकू दिसत असून गळ्यातही मोठं मंगळसूत्र आहे.. याशिवाय “लग्नविधींनंतर घातलेल्या मंगळसूत्राच्या उलट्या वाट्या, कुणालच्या घरच्यांसाठी आणल्या तांदळाच्या खीरीने भरलेल्या वाट्या.” असा खणखणीत उखाणा घेऊन तिने तिच्या मराठमोळ्या चाहत्यांना आणि सासरच्या मंडळींना खुश करून टाकले आहे..

 

सोनालीच्या हातातल्या खिरीच्या वाट्या पाहून अनेकांना तांदळाची खीर खाण्याचं टेम्प्टेशन होतं आहे.. तुम्हालाही होत असेल, तर बघा ही रेसिपी आणि करून बघा खीर..तांदळाची खीर करण्याची रेसिपी साहित्य२ चमचे आंबेमोहोर तांदुळ, अर्धा लीटर दुध, १ टीस्पून वेलची पुड, पाव कप साखर, बदाम- काजूचे तुकडे आणि मणूके हे सगळं मिळून पावकप, खोवलेलं नारळ आणि केशराच्या ४ ते ५ काड्या.कशी करायची खीर?- खीर करण्यासाठी २ चमचे आंबेमोहर, किंवा बासमती किंवा इंद्रायणी तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा. - त्यानंतर पाण्यासकट मिक्सरमधून फिरवा आणि थोडी जाडीभरडी पेस्ट करून घ्या.- तोपर्यंत अर्धा लीटर दूध गॅसवर गरम करायला ठेवून द्या. गरम दूधात तांदळाची प्युरी सोडा आणि व्यवस्थित मिक्स करा. तांदूळ फुगतो आणि खीर आपोआपच दाट होत जाते. 

- त्यानंतर त्यात काजू- बदामाचे काप घाला आणि १५ ते २० मिनिटे मध्यम आचेवर शिजवून घ्या. -  खीर आटून यायला सुरुवात झाली की तांदूळ हाताने दाबून पहा. मऊसूत झाला की त्यात पावकप साखर, ३ ते ४ केसराचे तुकडे, १ वाटी खोवलेलं नारळ आणि वेलची पूड टाका. - पुन्हा सगळं मिश्रण हलवून एकत्र करा आणि ४ ते ५ मिनिट शिजवून झालं की गॅस बंद करा.- ही खीर आवडीनुसार गरम किंवा गार खाता येते. पोळीसोबत, पुरीसोबत किंवा नुसती प्यायलाही छान लागते. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीइन्स्टाग्रामसोनाली कुलकर्णीसेलिब्रिटीलंडन