काही काही अभिनेत्रींना कुकींगची खरोखरच आवड असते. नेहमीच्या त्यांच्या व्यस्त शेड्यूलमुळे एरवी स्वयंपाक घरात रमण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसला, तरी काही खास प्रसंगी अनेक अभिनेत्री त्यांच्या स्वयंपाक घरात नक्कीच काहीतरी रेसिपी करताना दिसतात. मागे असाच मीरा राजपूतचा काजुकतली करतानाचा एक फोटो व्हायरल झाला होता. अभिनेत्री इशा देओल हिनेही पोंगल सणानिमित्त पारंपरिक पदार्थ केला होता. अनुष्का शर्माने एकदा टोमॅटो सॉस कसा करायचा, याची रेसिपी शेअर केली होती. तशीच आता चर्चा आहे ती यामी गौतम हिने केलेल्या बनाना केकची (Special banana cake recipe by Actress Yami Gautam).
यामीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तिच्या बहिणीचा दिड ते दोन वर्षांचा एक गोंडस मुलगा दिसतो आहे. "Donut & his maasi" अशी कॅप्शन तिने या व्हिडिओला दिली असून ती लाडाने तिच्या भाच्याला डोनट म्हणत असावी,
इन्स्टंट नूडल्स करताना लक्षात ठेवा ३ खास गोष्टी, नेहमीच्याच नूडल्स होतील आणखी चवदार!
असं यावरून दिसतं. यामी केक बनविताना अतिशय उत्साहात दिसत असून तिने केलेला केकही परफेक्ट झाला असावा, असं या व्हिडिओवरून दिसतं. केकसाठी कोणता पदार्थ किती प्रमाणात घेतला, याची सविस्तर माहिती तिने दिलेली नाही. पण साधारण कोणकोणते पदार्थ घेतले आहेत, हे समजू शकतं.
यामी गौतमने कसा बनवला बनाना केक?बनाना केक करण्यासाठी यामीने सगळ्यात आधी केळी घेतली आणि ती व्यवस्थित मॅश केली. त्यानंतर त्यात वितळवून घेतलेलं बटर, मैदा, व्हॅनिला इसेंन्स, कोको पावडर, पिठी साखर, क्रिम आणि दूध घातलं.
दिवाळीनंतर खूप दिवसांनी व्यायामाला सुरुवात करताय? ४ चुका करू नका, तज्ज्ञ सांगतात..
हे सगळं मिश्रण केक पॅनमध्ये टाकलं. त्यानंतर त्यावरून काही सुकामेव्याचे तुकडे टाकले आणि मायक्रोवेव्हमध्ये बेक करायला ठेवून दिलं. यानंतर तयार झालेला जो केक तिने दाखवला होता, तो खरोखरंच दिसायला अगदी उत्तम होता.