Join us  

मुलांचा शाळेचा डबा पौष्टिक आणि चविष्ट करण्यासाठी १ खास टिप, खुद्द रणबीर ब्रार सांगतो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2024 11:28 AM

Add these three ingredients before covering lunch box to enhance taste : आपल्या नवऱ्याचा व मुलांचा डबा अधिक स्वादिष्ट कसा करावा याचीच ही सोपी ट्रिक...

आपल्यापैकी बऱ्याचजणी सकाळी उठून घरातल्या व्यक्तींसाठी स्वयंपाक करतात. घरातील ऑफिसला जाणाऱ्या व्यक्तींचा व मुलांचा टिफिन बनवण्याची अनेकींची घाई असते. सकाळी उठून टिफिन बनवण्यासोबतच सकाळचा नाश्ता, इतरही कामं तिला झटपट आवरावी लागतात. या कामाच्या गडबडीत कधी कधी  घाईघाईत स्वयंपाक बनवावा लागतो. अशावेळी इतकी मेहेनत करुन बनवलेल्या स्वयंपाकाची चव बिघडते. असा चव बिघडलेला स्वयंपाक मुलांना व नवऱ्याला डब्यांत देताना त्या गृहिणीला फार वाईट वाटते. जर आपण डब्यांत अन्नपदार्थ भरताना त्यावरुन काही सिक्रेट पदार्थ घातले तर त्या पदार्थाची बिघडलेली चव दुरुस्त करता येऊ शकते(What 3 ingredients can make just about any dish taste better).

जर आपण कुणासाठी जेवणाचा डबा पॅक करुन देणार असाल तर, शेफ रणवीर ब्रारने (Chef Ranveer Brar) एक खास सिक्रेट शेअर केले आहे. डब्याचे झाकण बंद करण्यापूर्वी त्यात काही सिक्रेट पदार्थ घातल्यास त्या पदार्थाची चव आणखीच वाढते. सुप्रसिद्ध मास्टर शेफ रणवीर ब्रारने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने जेवणाचा डबा पॅक करून एखाद्याला कसा द्यायचा हे सांगितले आहे. रणवीरने सांगितलेली ही सोपी ट्रिक वापरून आपण देखील आपल्या नवऱ्याचा व मुलांचा डबा अधिक स्वादिष्ट बनवू शकता. पाहूयात काय आहे ही सोपी ट्रिक(Add these three ingredients before covering lunch box to enhance taste).

 जेवणाचा डबा पॅक करताना त्यात घाला 'हे' पदार्थ... 

१. रणवीर सांगतो, जेवणाचा डबा पॅक करताना सगळ्यांतआधी सर्वात खाली असणाऱ्या डब्यांत डाळ आणि भाज्या ठेवाव्यात. त्यानंतर उरलेल्या डब्यात भात आणि चपाती ठेवावी. आता आपण डाळ किंवा ग्रेव्ही असणारी पातळ भाजी यांवर गरम मसाला, बारीक चिरलेला पुदिना, बारीक चिरलेली कोथिंबीर, किसून घेतलेले आले पसरवून घाला. त्यानंतर तो पदार्थ न ढवळता झाकण बंद करा आणि टिफिन रेडी आहे. वरुन घातलेल्या या मसाल्यांमुळे त्या पदार्थाची चव अधिक चांगली होते.

दुधावर साय कमी येत असली तरी तूप होईल भरपूर, सायीत मिसळा १ पदार्थ आणि पाहा जादू...

 धो धो कोसळणाऱ्या पावसात खा खमंग, खुसखुशीत पालक वडी, पौष्टिक वडीची सोपी रेसिपी... 

जेवणाच्या डब्यात मसाले घालताना या चुका करू नका... 

१. जेवणाच्या डब्यात मसाले घालताना लक्षात ठेवा की अन्न गरम असावे, नसेल तर नक्कीच गरम करावे. जेवण गरम झाल्यावरच त्यात आले, धणे, पुदिना आणि गरम मसाल्याचा स्वाद येतो.

२. गरम मसूर आणि भाज्यांवर आले, पुदिना, गरम मसाला आणि कोथिंबीर घातल्यानंतर अजिबात ढवळू नका. वर पसरवून घातल्यानंतर , झाकण बंद करा, नंतर आपण ते मिक्स करू शकता आणि जेवताना खाऊ शकता.

३. जर तुम्हाला तुमच्या जेवणात मसालेदार आणि जास्तीची तिखट चव हवी असेल किंवा जर मसालेदार पदार्थ खायला आवडत असतील तर आपण लाल तिखट आणि चाट मसाला, जिरे पावडर देखील घालू शकता. यासोबतच आले, धणे, पुदिना आणि गरम मसाला देखील घालू शकता.

टॅग्स :अन्नकिचन टिप्स