Join us  

चहा करताना साखर आधी घालावी की नंतर? फक्कड चहा घरी करताना घाला '१' सिक्रेट पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2024 12:36 PM

Add this 1 SECRET Ingredient while making TEA : चहा पाणचट होतो? दूध - पाण्याचे प्रमाण चुकतं? आलं कधी घालावं? पाहा..

चहाला वेळ नाही तर. वेळेला चहा लागतोच (Tea Making). चहाचा चाहतावर्ग फार मोठा आहे. घोटभर चहाशिवाय तल्लफ मिटतच नाही. पण चहा बनवणे सोपे जरी असले तरी, अचूक साहित्यात बनवल्यास फक्कड चहा तयार होतो (Cooking Tips). अन्यथा चहा पाणचट होतो. काही वेळेला चहामध्ये साखर कमी पडते. तर काही वेळेला पाण्याचे प्रमाण जास्त होते.

टपरीवर मिळतो तसा चहा करण्याचं प्रयत्न आपण सर्वजण करतो. पण तशा पद्धतीचा चहा घरी तयार होत नाही. चहा प्रेमींना त्यांच्या आवडीनुसार चहा लागतो. तर काहींना टपरीवरचा चहा लागतो. जर आपल्याला घरी टपरीवर मिळतो, तसा फक्कड चहा करायचं असेल तर, साखर घालण्याची योग्य पद्धत पाहा. टपरीवर मिळतो, तसा फक्कड चहा तयार होईल(Add this 1 SECRET Ingredient while making TEA).

टपरीवर मिळतो तसा चहा करा घरीच

लागणारं साहित्य

पाणी

साखर

चहापत्ती

उष्माघाताचा कहर, शाहरुख खानला आली भोवळ! सनस्ट्रोकचा धोका टाळायचे पाहा उपाय - नाहीतर व्हावे लागेल ऍडमिट

आलं

दूध

कृती

फक्कड चहा तयार करण्यासाठी सर्वप्रथम, गॅसवर चहाचं भांडं ठेवा. त्यात अर्धा कप पाणी घाला. मग त्यात ४ चमचे साखर घाला. आपण आपल्या आवडीनुसार त्यात साखर घालू शकता. साखर पाण्यात विरघळल्यानंतर त्यात २ कप पाणी घाला, आणि मग २ चमचे चहापत्ती घालून मिक्स करा.

झाडांची वाढ ते तुंबलेलं सिंक; ३ गोष्टींसाठी वापरा एक्सपायरी डेट उलटलेली औषधे

चहापत्ती घातल्यानंतर त्यात ठेचून घेतलेलं आलं घाला. मध्यम आचेवर गॅस ठेवा. चहाला उकळी फुटल्यानंतर त्यात एक कप दूध घाला. दूध गरम नसून, कोमट किंवा थंड घालावं. उकळी फुटल्यानंतर गॅस बंद करा. अशा प्रकारे टपरीवर मिळतो तसा फक्कड चहा पिण्यासाठी रेडी. आपण त्यात आपल्या आवडीनुसार मसाले देखील मिक्स करू शकता. यामुळे चहाची अधिक चव वाढेल.  

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.