आता सणावाराला सुरुवात झाली (Festival). सर्वत्र नवरात्रीचा उत्सव साजरा होत आहे (Navratri 2024). यातच काही दिवसांमध्ये दसरा येईल. दसऱ्यामध्ये पुरी - बटाट्याच्या भाजीचा बेत हमखास केला जातो. पुरी आणि बटाट्याची भाजी खायला कोणाला नाही आवडत. पण दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने वजन वाढतं. पुऱ्या जास्त तेलकट होतात (Poori). ज्यामुळे काही लोकं पुऱ्या खाणं टाळतात (Kitchen Tips).
कितीही प्रयत्न केला तरी, पुऱ्या कमी तेलकट होत नाहीत. पुऱ्या तळण्यासाठी तेल हवेच. पण आपण पुऱ्या जास्त तेलकट होऊ नये, म्हणून काही टिप्स देखील फॉलो करू शकता. यामुळे पुऱ्या तेलकट न होता, छान फुलतील आणि कडकही होणार नाहीत. पुऱ्या करताना कोणत्या टिप्स लक्षात ठेवाव्यात? पाहा(ADD THIS to make Puffy Poori without absorbing oil | Awesome tips).
पुरी करण्यासाठी अशा पद्धतीने कणिक मळून घ्या
- चपाती आणि पुरीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने कणिक मळून घ्यावे. चपातीसाठी मऊ आणि पुऱ्या करण्यासाठी घट्ट कणिक मळावे. जेणेकरून पुऱ्या जास्त तेल पिणार नाहीत. शिवाय पुऱ्या छान फुलतात.
किचनमधील 'हे' ५ पदार्थ कधीही खराब होत नाही, कालबाह्य म्हणून अजिबात फेकून देऊ नका; योग्य साठवून ठेवा
- जर आपण कणिक स्टोअर केलं असेल तर, त्यात आणखीन गव्हाचं पीठ घालून कणिक मळून घ्या. शिवाय कणिक मळताना त्यात चमचाभर कोमट तेल घाला. यामुळे कणिक छान मळून तयार होईल.
- पुऱ्या तळण्यासाठी नेहमी रिफाइंड किंवा सोयाबीन तेलाचा वापर करावा. यामुळे पुऱ्या जास्त तेल अॅब्सॉर्ब करणार नाहीत.
- पुऱ्या तळताना तेलाच्या तपमानाकडेही लक्ष द्यायला हवे. जास्त गरम तेलात पुऱ्या तळल्याने तेल अधिक प्रमाणात शोषून घेतात. ज्यामुळे पुऱ्या फार तेलकट होतात. त्यामुळे तळताना पुऱ्या नेहमी गॅस मध्यम आचेवर ठेवावे.
चहा-चपातीचा नाश्ता रोज करता? तज्ज्ञ सांगतात, कुणी खावं - कुणी टाळावं? नाहीतर पोट बिघडेल आणि..
- पुऱ्या कडक किंवा जास्त प्रमाणात तेल शोषून घेत असतील तर, पुरी तळताना तेलामध्ये थोडे मीठ घाला. मीठ घातल्यानंतर पुऱ्या जास्त तेल अॅब्सॉर्ब करणार नाहीत. शिवाय कडकही होणार नाही.