Lokmat Sakhi >Food > अक्षय्य तृतीया स्पेशल : ताज्या ताज्या रसाळ आंब्यांचं करा आम्रखंड, नैवेद्यासाठी स्पेशल पदार्थ

अक्षय्य तृतीया स्पेशल : ताज्या ताज्या रसाळ आंब्यांचं करा आम्रखंड, नैवेद्यासाठी स्पेशल पदार्थ

Akshaya Tritiya Special : aamrakhand | instant mango shrikhand आंब्याच्या मौसमात आंब्याचेच पदार्थ खावेसे वाटतात, आम्रखंड तर व्हायलाच हवं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2023 07:19 PM2023-04-21T19:19:54+5:302023-04-21T19:20:57+5:30

Akshaya Tritiya Special : aamrakhand | instant mango shrikhand आंब्याच्या मौसमात आंब्याचेच पदार्थ खावेसे वाटतात, आम्रखंड तर व्हायलाच हवं

Akshaya Tritiya Special : aamrakhand | instant mango shrikhand | अक्षय्य तृतीया स्पेशल : ताज्या ताज्या रसाळ आंब्यांचं करा आम्रखंड, नैवेद्यासाठी स्पेशल पदार्थ

अक्षय्य तृतीया स्पेशल : ताज्या ताज्या रसाळ आंब्यांचं करा आम्रखंड, नैवेद्यासाठी स्पेशल पदार्थ

प्रत्येक घरात सणाला किंवा शुभ प्रसंगी गोड पदार्थ करण्यात येते. सध्या आंब्याचा सिझन सुरु आहे. फळांचा राजा असलेल्या आंब्याची आवक बाजारात सुरू झाली की, अनेकांना आम्रखंडाची आठवण येते. आंब्याचे अनेक पदार्थ बनवले जातात. जे लहानग्यांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडतात. आपण श्रीखंड तर खातोच हा पदार्थ घरी बनवायला देखील सोपा आहे. पण आपण कधी घरी आम्रखंड हा पदार्थ ट्राय केला आहे का?

अक्षय्य तृतीयानिमित्त अनेक घरात आम्रखंड पुरी हा पदार्थ बनवला जातो. सहसा आम्रखंड दुकानातून विकतचे आणले जाते. पण विकतचे आम्रखंड आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी ही रेसिपी बनवू शकता. आंब्याच्या सिझनमध्ये हा पदार्थ चवीला उत्कृष्ट लागतो. आपण ही रेसिपी कमी साहित्यात, कमी वेळात करू शकता. चला तर मग अक्षय्य तृतीयानिमित्त घरी आम्रखंड बनवून सर्वांचं तोंड गोड करूया(Akshaya Tritiya Special : aamrakhand | instant mango shrikhand).

आम्रखंड बनवण्यासाठी लागणारं साहित्य

घरातच बनवलेला किंवा विकत आणलेला चक्का

पिठी साखर

आंब्याचा पल्प (शक्यतो हापूस आंबा)

काकडीची कोशिंबीर खाऊन कंटाळा आलाय? ५ मिनिटात करा बीटाची पौष्टीक खमंग कोशिंबीर..

इलायची पावडर

काजू

बदाम

जायफळ पावडर 

या पद्धतीने बनवा गोड आम्रखंड

सर्वप्रथम, चक्का बनवून घ्या, यासाठी दुधापासून बनवलेले घट्ट दही एका सुती पातळ कापडात बांधून घ्या. ४ तासांसाठी त्याच्यावर एखादी वजनदार वस्तू ठेवा. यामुळे आपल्याला घट्टसर चक्का मिळेल. घरी बनवायला वेळ नसेल तर, आपण दुकानातून देखील चक्क आणू शकता.

आता एका बाऊलमध्ये तयार चक्का आणि पिठीसाखर घ्या. आपण हे दोन्ही साहित्य समप्रमाणात घेऊ शकता. आता बिटर किंवा मिक्सरच्या मदतीने साहित्य मिक्स करा. बिटरने देखील आपण मिश्रण चांगले फेटून घेऊ शकता. दुसरीकडे आंब्याचा गर मिक्सरमधून वाटून घ्या त्याची पेस्ट तयार करा. तयार आंब्याची पेस्ट, चक्का आणि साखरेच्या मिश्रणात घाला. आता हे सर्व साहित्य एकत्र फेटून घ्या.

ना चिक काढण्याची झंझट, ना जास्त मेहनत, आता घरीच करा रव्याची कुरडई, फुलते भरपूर

फेटून झाल्यानंतर हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घ्या, त्यात केशरचे दूध, इलायची पावडर, जायफळ पावडर, काजू, बदाम घालून मिश्रण चांगले मिक्स करा. अशा प्रकारे आम्रखंड रेडी, खाण्याआधी हे तयार आम्रखंड २ ते ३ तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवा. त्यामुळे याला थोडा घट्टपणा येईल.

Web Title: Akshaya Tritiya Special : aamrakhand | instant mango shrikhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.