Join us  

Akshaya Tritiya Special Food : अक्षय्य तृतीयेला झटपट बनवा गुळाच्या खुसखुशीत सांजोऱ्या; ही घ्या खान्देशी पद्धतीची सोपी, पारंपरिक रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2022 2:57 PM

Akshaya Tritiya Special Food : करंजीपेक्षा जास्त मऊ, गोड आणि खुसखुशीत सांजऱ्या खाण्याची मजा काही वेगळीच आहे. विशेष म्हणजे सांजरीच्या आतलं मिश्रण करंजीच्या मिक्षणासारखं कडक नसतं. (Akshaya Tritiya 2022)

अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2022)  म्हटलं की सगळ्याचं आधी आठवतं ते म्हणजे आमरसाचं जेवण. अक्षय्य तृतीयेला सगळ्यांच्याच घरात पुरणाचा, गोडा धोडाचा स्वयंपाक केला जातो. याव्यतिरिक्त या  दिवसासाठी गुळाच्या सांजोऱ्यासुद्धा बनवल्या जातात. या करंज्यांप्रमाणे दिसणाऱ्या सांजऱ्या तुम्ही नंतर आठवडाभर खाऊ शकता. (Akshaya Tritiya 2022 special  food gulachi sanjori  jaggery karanji)

करंजीपेक्षा जास्त मऊ, गोड आणि खुसखुशीत सांजऱ्या खाण्याची मजा काही वेगळीच आहे. विशेष म्हणजे सांजरीच्या आतलं मिश्रण करंजीच्या मिक्षणासारखं कडक नसतं. (Cooking Tips) सांजरीचं स्टफिंग गूळ वापरल्यामुळे थोडं सॉफ्ट असतं. त्यामुळे ही खास पद्धतीची करंजी तोंडात टाकताच पाणी होतं. या लेखात तुम्हाला अक्षय्य तृतीया स्पेशल सांजरीची (Akshaya Tritiya Special Food) रेसेपी दाखवणार आहोत. 

साहित्य

सांजोरीचे सारण : -

दीड कप रवा

दीड कप चिरलेला काळा गूळ (पिवळा गूळही चालेल)

१ वाटी भाजून, बारीक केलेलं सुकं खोबरं

३ चमचे तूप

१ चमचा भाजलेली खसखस

१ चमचा वेलचीपूड, जायफूडपूड

काजू बदामाची पूड- आवडीनुसार

१ कप पाणी

सांजोरीच्या आवरणासाठी

2 कप मैदा

2 टेबलस्पून साजूक तूपाचे मोहन

२ चमचे मीठ, 

अर्धा कप दूध, 

पीठ मळण्यासाठी  दीड कप रवा

तळण्यासाठी तेल

सांजोरी करण्यासाठी सारणाची आणि आवरणाची वेगवेगळी तयारी करून घ्या. खसखस व खोबरं  खमंग भाजून घ्या. कढईत 2 चमचे  तूप घालून रवा भाजून घ्यावा. रवा भाजताना मध्यम गोल्डन होऊ द्या. जास्त लाल होणार नाही याची काळजी घ्या.

नंतर कढईत एक कप पाणी गरम करत ठेवा.  पाण्यात एक चमचा तूप घाला आणि गूळ घाला गूळ पूर्णपणे विरळल्यानंतर काजू, बदाम, खसखस याची पूड घाला. त्यात भाजलेला रवा आणि खोबरंही घाला.  हे मिश्रण चमच्याच्या साहाय्यानं ढवळा. कढईला मिश्रण चिकटणार नाही याची काळजी घ्या. . मिश्रण थंड झाले की या सारणाचे लहान लहान गोळे बनवा.

परातीत मैदा, रवा घेऊन त्यात तुपाचे मोहन व मीठ चवीपुरते घालून पीठ दुधात घट्ट भिजवून ठेवावे. पीठ भिजवून झाल्यानंतर थोडावेळ तसेच राहू द्या. नंतर पीठाचे लहान गोळे करून त्याची पारी लाटा आणि त्यात सारण भरून सांजरीचा आकार द्या. तेल तापल्यानंतर एक एक सांजरी व्यवस्थित गुलाबी होईपर्यंत तळून घ्या. तयार आहेत स्वादिष्ट सांजऱ्या.

1) 

2) 

टॅग्स :अक्षय्य तृतीयाअन्नपाककृती