Lokmat Sakhi >Food > अक्षय्य तृतीया स्पेशल : घरच्या घरीच १० मिनिटात करा आंब्याचे पेढे, तोंडात टाकताच विरघळेल...

अक्षय्य तृतीया स्पेशल : घरच्या घरीच १० मिनिटात करा आंब्याचे पेढे, तोंडात टाकताच विरघळेल...

Akshaya Tritiya Special : How To Make Mango Peda At Home : यंदा अक्षय्य तृतीयेला नैवेद्याला करा आंब्याचे पेढे, खा मनसोक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2023 02:40 PM2023-04-21T14:40:37+5:302023-04-21T14:52:05+5:30

Akshaya Tritiya Special : How To Make Mango Peda At Home : यंदा अक्षय्य तृतीयेला नैवेद्याला करा आंब्याचे पेढे, खा मनसोक्त

Akshaya Tritiya Special : How To Make Mango Peda At Home | अक्षय्य तृतीया स्पेशल : घरच्या घरीच १० मिनिटात करा आंब्याचे पेढे, तोंडात टाकताच विरघळेल...

अक्षय्य तृतीया स्पेशल : घरच्या घरीच १० मिनिटात करा आंब्याचे पेढे, तोंडात टाकताच विरघळेल...

'पेढा' हे एक पारंपारिक भारतीय मिष्टान्न असून तो प्रामुख्याने सण आणि समारंभाच्या दिवशी किंवा एखादा आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी हमखास बनवला जातो. पेढा हा एक असा पदार्थ आहे की कोणत्याही खास प्रसंगाच्या दिवशी तो आवर्जून खाल्ला जातो. स्वादिष्ट आणि जीभेवर विरघळणारा हा टेस्टी पेढा जगभर सर्वत्र अतिशय लोकप्रिय आहे. आपण आपल्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे आणि फ्लेवरचे पेढे सहज बनवू शकतो. तरीही आंबा प्रेमींसाठी आंब्याचा पेढा म्हणजे जणू काही पर्वणीच असते.

अक्षय्य तृतीया हा सण आपल्याकडे साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्वाचा दिवस मानला जातो. यादिवशी हा सण साजरा करुन घरात गोडाधोडाचे पदार्थ तयार केले जातात. आपल्याकडील प्रत्येक भारतीय सणाला पेढ्याला एक प्रकारचे पारंपरिक महत्व असते. बरीच लोक बाजारातून विकत घेऊन पेढ्याचा आस्वाद घेतात पण तुम्ही घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारे पेढे तयार करु शकता. यंदाच्या अक्षय्य तृतीयेला आंब्याचे पेढे झटपट घरच्या घरीच बनवून मनसोक्त खाण्याचा आनंद लुटा(Akshaya Tritiya Special : How To Make Mango Peda At Home). 

साहित्य :- 

१. खवा - २०० ग्रॅम 
२. पिठीसाखर - ५० ग्रॅम 
३. आंब्याचा रस - २०० मिली
४. वेलची पूड - १/२ टेबलस्पून 
५. अक्रोड, बदाम - पिस्ता काप - २ ते ३ टेबलस्पून 

अस्सल देवगड 'हापूस' कसा ओळखाल? ६ टिप्स, पैसे मोजताय तर घ्या अस्सल आंबा...

कृती :- 

१. एका मोठ्या कढईमध्ये खवा भाजून घेऊन त्यात आंब्याचा रस घालून खवा आणि आंब्याचा रस एकजीव करुन घ्यावे. 
२. जेव्हा खवा आणि आंब्याच्या रसाचे मिश्रण एकजीव होईल तेव्हा त्यात अक्रोड, बदाम - पिस्त्याचे काप, पिठीसाखर, वेलची पूड घालावी.  
३. हे मिश्रण चमच्याने ढवळून एकजीव झाल्यानंतर गॅसवरुन खाली उतरवून घ्यावे.   
४. आता हे पेढ्याचे मिश्रण तयार झालेले आहे, या तयार मिश्रणाचे गोलाकार किंवा आपल्या आवडीच्या आकाराचे पेढे करुन घ्यावेत. 
५. पेढे तयार झाल्यावर आपल्या आवडीनुसार त्यावर ड्राय फ्रूट्सचे काप घालून पेढे सर्व्ह करावेत. 

आंब्याच्या साली फेकू नका, करा कुरकुरीत वेफर्स! पदार्थ वाटेल वेगळा पण चव भारी...

आंब्याचे पेढे खाण्यासाठी तयार आहेत.

Web Title: Akshaya Tritiya Special : How To Make Mango Peda At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.