Join us  

कांदा भजी नेहमीची, बेसन पीठ न वापरता करा बटाटा - गाजर भजी, पचायला सोपी आणि खमंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2023 3:13 PM

Aloo Gajar Pakora Recipe - How to make Crispy Potato Carrot Pakora बेसन पीठ न वापरताही करा कुरकुरीत भजी

सायंकाळ झाल्यानंतर अनेकांना छोटी भूक लागते. ही छोटी भूक भागवण्यासाठी काही लोकं स्टॉलवरचे पदार्थ खाण्यासाठी बाहेर पडतात. क्रिस्पी - चमचमीत पदार्थ खाण्यासाठी अनेक जण वडा पाव, समोसा, भजी, चाट या पदार्थांवर ताव मारतात. पण कधी - कधी तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. काहीतरी हटके खाण्याची इच्छा सगळ्यांचीच होते.

आपल्याला देखील तेच स्नॅक्स खाऊन कंटाळा आला असेल तर, क्रिस्पी बटाटा गाजर पकोडा ही रेसिपी ट्राय करून पाहा. घरात बेसनचं पीठ नसेल तर, काही हरकत नाही. आपण मैदा आणि कॉर्नफ्लोरचा वापर करून कुरकुरीत बटाट्याची आगळी वेगळी भजी बनवू शकता. ही रेसिपी कमी वेळात, कमी साहित्यात तयार होते. चला तर मग या पदार्थाची कृती पाहूयात(Aloo Gajar Pakora Recipe - How to make Crispy Potato Carrot Pakora).

क्रिस्पी बटाटा गाजर पकोडा  करण्यासाठी लागणारं साहित्य

बटाटे

गाजर

पाणी

मीठ

काळी मिरी पावडर

लसूण

कोथिंबीर

चिली फ्लेक्स

आंब्याचा रस काळा पडू नये म्हणून ४ टिप्स, रस दिसेल पिवळाजर्द-चवही राहील परफेक्ट

मैदा

कॉर्न फ्लोअर

तेल

अशी करा बटाट्याची आगळी - वेगळी भजी

सर्वप्रथम, बटाट्याचे साल काढून घ्या, व किसणीने बटाट्याचे किस किसून घ्या. हा बटाट्याचा किस एका बाऊलमध्ये काढून घ्या, आता किसणीने गाजराचे किस देखील किसून घ्या. या किसमध्ये पाणी घालून चांगले धुवून घ्या. व त्यातून अतिरिक्त पाणी काढून घ्या. आता या मिश्रणात मीठ, काळी मिरी पावडर, बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेली कोथिंबीर, चिली फ्लेक्स, २ चमचे मैदा, १ चमचा कॉर्न फ्लोअर घालून मिश्रण चांगले मिक्स करून घ्या.

२ कांदे - मुठभर शेंगदाण्याची करा चवदार चटणी, चव अशी की भाजी खायला विसराल

आता त्यात २ चमचे पाणी घालून मिश्रण हाताने मिक्स करा. दुसरीकडे एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात बटाट्याच्या मिश्रणाचे बॉल घालून, सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. अशा प्रकारे क्रिस्पी बटाटा गाजर पकोडा खाण्यासाठी रेडी. आपण ही भजी सॉस किंवा चटणीसह खाऊ शकता.  

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स