Lokmat Sakhi >Food > कुणाल कपूर स्पेशल आलू- मेथी पराठा! हिवाळ्यात नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी परफेक्ट रेसिपी

कुणाल कपूर स्पेशल आलू- मेथी पराठा! हिवाळ्यात नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी परफेक्ट रेसिपी

Aloo Methi Paratha By Chef Kunal Kapoor: हिवाळ्यात भरपूर मेथी आणि बटाटे घालून केलेले हे पराठे एकदा करून बघाच...(easy and healthy breakfast recipe)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2024 01:42 PM2024-12-10T13:42:49+5:302024-12-10T13:44:15+5:30

Aloo Methi Paratha By Chef Kunal Kapoor: हिवाळ्यात भरपूर मेथी आणि बटाटे घालून केलेले हे पराठे एकदा करून बघाच...(easy and healthy breakfast recipe)

Aloo methi paratha by chef kunal Kapoor, how to make aloo methi paratha, easy and healthy breakfast recipe, easy and quick recipe for kids tiffin | कुणाल कपूर स्पेशल आलू- मेथी पराठा! हिवाळ्यात नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी परफेक्ट रेसिपी

कुणाल कपूर स्पेशल आलू- मेथी पराठा! हिवाळ्यात नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी परफेक्ट रेसिपी

Highlightsतव्यावर खरपूस भाजल्यानंतर त्याला भरपूर तूप लावा आणि गरमागरम पराठे दह्यासोबत, लोणच्यासोबत, लोण्यासाेबत खाण्याचा आस्वाद घ्या. 

बाजारात ताज्या, हिरव्यागार, लुसलुशीत, कोवळ्या पालेभाज्या आता भरपूर प्रमाणात दिसायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खवय्यांची पावलं आपोआप भाज्यांच्या गाड्यांकडे वळतात आणि मग घरच्याघरी चटकदार रेसिपी करायला सुरुवात होते. या दिवसांत मेथी भरपूर प्रमाणात मिळते. म्हणूनच आता छान हिरवीगार मेथीची जुडी बाजारातून घेऊन या आणि लगेचच कुणाल कपूर स्टाईलने त्याचे आलू- मेथी पराठे करून पाहा (how to make aloo methi paratha?). हे पराठे पटापट होतात शिवाय चवीला अतिशय उत्तम लागतात (Aloo methi paratha by chef Kunal Kapoor). हिवाळ्यात नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी हा एक परफेक्ट पदार्थ होऊ शकतो (easy and healthy breakfast recipe). तसेच रात्री खूप हेवी खायचं नसेल तर आलू मेथी पराठे हा एक उत्तम पर्याय होऊ शकतो..

 

आलू- मेथी पराठा रेसिपी

साहित्य

२ ते ३ कप बारीक चिरलेली मेथी

२ कप गव्हाचे पीठ

३ उकडलेले बटाटे

२०२४ मध्ये सगळ्यात जास्त व्हायरल झालेल्या किचन टिप्स! सांगा तुम्हाला यापैकी किती माहिती आहेत

२ टीस्पून आलं लसूण पेस्ट

२ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या

१ टीस्पून चाट मसाला

१ टीस्पून आमचूर पावडर

१ टीस्पून धने, जिरेपूड

२ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर

चवीनुसार मीठ

 

कृती

सगळ्यात आधी मेथी बारीक चिरून घ्या आणि त्यानंतर ती एका मोठ्या भांड्यात काढा. त्यामध्ये कणिक टाका आणि चवीनुसार मीठ टाकून कणिक व्यवस्थित मळून घ्या. आता ही कणिक काही वेळ झाकून ठेवा.

प्रिती झिंटाच्या लाडक्या लेकाने आजीसोबत लाटल्या पोळ्या, फोटो शेअर करत म्हणाली, ही तर आयुष्यातली....

बटाटे उकडून त्यांची सालं काढून घ्या. त्यानंतर ते मॅश करा. त्यामध्ये आलं- लसूण पेस्ट, मिरचीचे तुकडे, चाट मसाला, आमचूर पावडर, धणे आणि जीरे यांची पूड चवीनुसार लाल तिखट असं सगळं टाका आणि व्यवस्थित एकजीव करून सारण तयार करून घ्या.

५ रुपयांची तुरटी चेहऱ्यावर करेल कमाल! पिंपल्स, ॲक्ने जाऊन काही दिवसांतच त्वचा होईल स्वच्छ- सुंदर

यानंतर कणकेचा एक छोटा गोळा हातात घ्या. हातानेच तो व्यवस्थित पसरवून त्याला गोल आकार द्या. त्यामध्ये बटाट्याचं स्टफिंग भरा आणि नेहमीप्रमाणे बटाट्याचे पराठे जसे करतो तसे हे पराठे लाटून घ्या.

तव्यावर खरपूस भाजल्यानंतर त्याला भरपूर तूप लावा आणि गरमागरम पराठे दह्यासोबत, लोणच्यासोबत, लोण्यासाेबत खाण्याचा आस्वाद घ्या. 


 

Web Title: Aloo methi paratha by chef kunal Kapoor, how to make aloo methi paratha, easy and healthy breakfast recipe, easy and quick recipe for kids tiffin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.