Join us

बटाट्याचा पराठा लाटताना फाटतो- सारण बाहेर येतं? ३ सोप्या ट्रिक्स- सरसर लाटता येतील पराठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2024 09:15 IST

Tips And Tricks For Making Perfect Aloo Paratha: बटाट्याचा पराठा लाटताना तो फाटून सारण बाहेर येऊ नये म्हणून या काही सोप्या टिप्स...(how to fill stuffing in aloo paratha)

ठळक मुद्देबटाट्याचे किंवा अन्य कोणतेही स्टफ पराठे करताना या काही टिप्स फॉलो करून पाहा.

बटाट्याचा पराठा हा पदार्थ बहुतांश घरांमध्ये अतिशय आवडीने खाल्ला जातो. बच्चे कंपनीचा तर तो अगदी आवडीचा पदार्थ. त्यामुळे बटाट्याच्या पराठ्यांची फर्माहिश वारंवार येतेच. पण बऱ्याच जणींची अशी अडचण होते की पराठा लाटताना तो बरोबर मध्यभागी फाटतो आणि त्याच्या आतमध्ये भरलेलं सगळं सारण बाहेर येतं. ते सारण मग पोळपाट, लाटण्याला चिटकतं आणि मग सगळाच राडा होतो. हा पसारा एवढा वाढतो की मग पुढच्यावेळी बटाट्याचे पराठे करावेच वाटत नाहीत (How to prevent aloo paratha from breaking?). तुमचंही असंच काहीसं होत असेल तर मग बटाट्याचे किंवा अन्य कोणतेही स्टफ पराठे करताना या काही टिप्स फॉलो करून पाहा.(how to fill stuffing in aloo paratha?)

 

बटाट्याचा पराठा लाटताना फुटू नये म्हणून टिप्स

१. पराठे करण्यासाठी जेव्हा तुम्ही बटाटे उकडून घ्याल तेव्हा ते पुर्णपणे थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर ते किसून घ्या. काही जणी बटाटे हातानेच कुस्करतात. पण असं करताना जर बटाट्याचा एखादा मोठा तुकडा तुमच्या पराठ्यात आला तर लाटताना पराठा हमखास फुटतो. त्यामुळे पराठ्यासाठी उकडलेले बटाटे नेहमी किसूनच घ्यावेत. 

कधी कधी एन्झायटी वाढून खूप अस्वस्थ होतं? ५ पदार्थ खा- मन शांत होऊन रिलॅक्स वाटेल

२. किसून घेतलेल्या बटाट्यामध्ये जेव्हा तुम्ही वेगवेगळे पदार्थ टाकून त्याचं सारण तयार कराल तेव्हा ते किमान अर्धा तास फ्रिजमध्ये ठेवावे. यामुळे बटाट्यातला ओलसरपणा कमी होतो आणि तो अधिक घट्ट होतो. बटाट्यामध्ये जर जास्तच ओलसरपणा असेल तर पराठा लाटताना फाटू शकतो. 

 

३. पराठ्यासाठी कणिक भिजवताना ती खूप सैलसर भिजवू नये. थोडी घट्टच कणिक असावी पण ती व्यवस्थित मळून मऊ झालेली असावी.

पाठ- कंबर खूप दुखते? अर्ध पिंच मयुरासन करा, आखडलेलं अंग होईल मोकळं- मिळतील ५ फायदे 

जेव्हा तुम्ही कणकेचा गोळा घेऊन तो लाटाल तेव्हा त्याचा आकार खूप मोठा असू नये. शिवाय तो मध्यभागी खूप पातळ असू नये. मध्यभागी जर तुम्ही खूप पातळ केलं तर मग पराठा लाटताना फुटतो. तसेच पराठा अतिशय हळूवारपणे लाटावा. लाटताना त्याला पुरेसं पीठ लावावं, जेणेकरून तो अगदी हळूवारपणे पोळपाटावरून फिरू शकताे. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृतीबटाटा