Lokmat Sakhi >Food > टिफिनसाठी मुलांनी पराठा मागितला? टेन्शन घेऊ नका, १० मिनिटांत करा बटाटा पराठा, सारण न करता

टिफिनसाठी मुलांनी पराठा मागितला? टेन्शन घेऊ नका, १० मिनिटांत करा बटाटा पराठा, सारण न करता

Aloo Paratha Recipe || School Lunch Recipes Easy : कणीक न मळता; सारण न करता करा बटाट्याचा पराठा; १० मिनिटात चमचमीत पराठा रेडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2024 10:00 AM2024-06-28T10:00:10+5:302024-06-28T10:05:01+5:30

Aloo Paratha Recipe || School Lunch Recipes Easy : कणीक न मळता; सारण न करता करा बटाट्याचा पराठा; १० मिनिटात चमचमीत पराठा रेडी

Aloo Paratha Recipe || School Lunch Recipes Easy | टिफिनसाठी मुलांनी पराठा मागितला? टेन्शन घेऊ नका, १० मिनिटांत करा बटाटा पराठा, सारण न करता

टिफिनसाठी मुलांनी पराठा मागितला? टेन्शन घेऊ नका, १० मिनिटांत करा बटाटा पराठा, सारण न करता

काहीवेळेला घरात काहीही उपलब्ध नसतं. अशावेळी काहीतरी हटके खाण्याची इच्छा होते (Aloo Paratha). बऱ्याचदा पराठा खाण्याची इच्छा होते. पण सारण बनवण्यापासून ते कणिक मळण्यापर्यंत सर्व गोष्टी करून पराठा बनवावे लागते (food). ज्यामुळे पराठा तयार करणं अनेक लोक टाळतात (Cooking Tips). विविध प्रकारच्या भाज्यांचे सारण बनवून पराठे बनवले जाते.

बहुतांश लोकांना बटाट्याचा पराठा खायला आवडतो. पण जर आपल्याला सारण आणि कणिक मळण्याचा कंटाळा येत असेल तर, सोप्या पद्धतीचा इन्स्टंट बटाट्याचा पराठा तयार करा. ना कणिक मळायची झंझट ना सारण करायची, झटपट बटाट्याचा चविष्ट पराठा तयार होईल. आपण हा झटपट बटाट्याचा पराठा लहान मुलांना देखील खायला देऊ शकता(Aloo Paratha Recipe || School Lunch Recipes Easy).

इन्स्टंट बटाट्याचा पराठा करण्यासाठी लागणारं साहित्य

गव्हाचं पीठ

बेसन

चिली फ्लेक्स

जिरं

पावसाळ्यात सतत आजारी पडता? प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून करा ४ गोष्टी, व्हायरल इन्फेक्शन होतील कमी

हळद

लसूण आल्याची पेस्ट

कसुरी मेथी

ओवा

गरम मसाला

उकडून मॅश केलेला बटाटा

कोथिंबीर

मीठ

पाणी

कृती

सर्वात आधी एका बाऊलमध्ये २ कप गव्हाचं पीठ, २ चमचे बेसन, चिली फ्लेक्स, जिरं, हळद, लसूण आल्याची पेस्ट, कसुरी मेथी, ओवा, गरम मसाला, उकडून मॅश केलेला बटाटा, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, आणि गरजेनुसार पाणी घालून मिक्स करा. ज्याप्रमाणे आपण डोश्यासाठी बॅटर तयार करतो. त्याचप्रमाणे बटाट्याच्या पराठ्यासाठी सरसरीत बॅटर तयार करा.

वाटीभर रवा - एक चमचा बेसन; स्पॉन्जी इस्टंट मसाला इडली ढोकळा कधी करून पाहिलं आहे का?

बॅटर तयार झाल्यानंतर १० मिनिटांसाठी त्यावर झाकण ठेवा. १० मिनिटानंतर गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवा. तव्याला बटर लावा. त्यावर चमच्याने बॅटर ओतून पसरवा. तव्यावर २ मिनिटांसाठी झाकण ठेवा, व दोन्ही बाजूने भाजून घ्या. अशा प्रकारे चविष्ट बटाट्याचा पराठा खाण्यासाठी रेडी.

Web Title: Aloo Paratha Recipe || School Lunch Recipes Easy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.