Join us  

टोमॅटो महागलेत? डाळीला 'अशी' द्या खास पदार्थांची फोडणी; आंबटपणा येईल-डाळीची वाढेल चव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 7:23 PM

Alternatives of tomatoes for dal tadka : डाळीची चव वाढवण्यासाठी तुम्ही फोडणीमध्ये टोमॅटोऐवजी कोणते पदार्थ वापरू शकता ते पाहूया.

पावसाळ्याच्या दिवसात बाजारात भाज्यांचा पुरवठा कमी होतो. अनेक भाज्या या जास्त पावसामुळे खराब होतात. ज्यामुळे त्यांचे बाजारभाव वाढतात.  इतर दिवसांच्या तुलनेत  पावसाळ्याच्या दिवसात टोमॅटोचे भाव जास्त वाढतात. सध्या  बाजारात टोमॅटोचे भाव १२० रूपये प्रति किलोपेक्षा जास्त आहेत. (How to flavour dals without tomatoes) सर्व-सामान्यांवर  टोमॅटोच्या वाढलेल्या किमतीचा परिणाम होत आहे. म्हणूनच लोकांनी  गेल्या काही दिवसांपासून स्वंयपाकात टोमॅटो वापरण्याऐवजी इतर पर्याय पदार्थांचा वापर सुरू केला आहे. (Alternatives of tomatoes for dal tadka)

अनेकांच्या स्वंयपाकात टोमॅटोचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. डाळ अधिक स्वादीष्ट बनवण्यासाठी डाळीला टोमॅटोची फोडणी दिली जाते.  पण सध्या भाव वाढल्यामुळे डाळीत, भाजीत टोमॅटो घालणं टाळलं जात आहे. डाळीची चव वाढवण्यासाठी तुम्ही फोडणीमध्ये टोमॅटोऐवजी कोणते पदार्थ वापरू शकता ते पाहूया. (Tadka without tomatoes 5 ways of flavouring the dal)

१) डाळीचा चव वाढवण्यासाठी तुम्ही लसूण किंवा मोहोरीच्या तेलाची फोडणी देऊ शकता. लसणाचा सुगंध तीव्र असतो. मोहोरीचं तेल गरम केल्यानंतर अधिक तीव्र होते. यामुळे डाळीला सुंदर चव येईल.

२) मोहरी आणि जिऱ्याची फोडणी दिल्यास डाळीला वेगळाच टेक्सचर येतो. ही पद्धत खूपच सोपी आहे. सगळ्यात आधी एक भांडं गॅसवर ठेवा. त्यात २ चमचे मोहोरीचं तेल किंवा २ चमचे तूप घालून गरम करा आणि त्यात राई घाला.  राई-जीरं परतवल्यानंतर  त्यात डाळी घाला. 

३) कढीपत्ता घालूनही तुम्ही डाळीला फोडणी देऊ शकता. त्यासाठी एका भांड्यात तेल गरम झाल्यानंतर मोहोरी, जीरं, मिरच्या घालत्ल्यानंतर कढीपत्ता आणि लसूण घाला. यानंतर त्यात डाळ घालून व्यवस्थित मिक्स करा आणि गरमागरम जेवण सर्व्ह करा. 

४) डाळीत टोमॅटो लोक यासाठी घालतात जेणेकरून आंबटपणा येईल आणि जेवणाची चव वाढेल. अशा स्थितीत डाळीची चव वाढवण्यासाठी कैरी सोलून त्याचे छोटे तुकडे करा.  त्यामुळे डाळीला आंबटपणा येतो आणि टोमॅटोची कमतरताही पूर्ण होते.

५) डाळीत आंबटपणा येण्यासाटी तुम्ही  त्यात चिंचेचे पाणी किंवा कोकमाचे पाणी घालू शकता. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न