बारीक होण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतींचा विचार करत असतो.(Alternatives To Refined Sugar) वेगवेगळ्या पदार्थांचा आहारात समावेश करून घेतो. काही पदार्थ आहारात घेणं बंद करून टाकतो. खास करून साखर.(Alternatives To Refined Sugar) कोणत्याही डायटिशियनला, जीमट्रेनरला, डॉक्टरला विचारलं कि, नक्की काय खाणं बंद करू? तर पहिलं उत्तर साखर बंद करा असंच असत. साखर बंद करून वजन कमी करणारे अनेक आहेत. पण जीवनातून गोडवाच नाहीसा करून टाकणं बऱ्याच जणांसाठी शक्य नाही. साखरेला डॉक्टर विष म्हणतात. पण दिल है के मानता नही.(Alternatives To Refined Sugar) गोड खाण्याच्या क्रेव्हिंग्जवर नियंत्रण ठेवणे तसे सोपे नाही.
मुळात ही इच्छा साखर खाण्याची नसते तर, गोड खाण्याची असते. जर साखरेशिवाय जीभेचे चोचले पुरवोता आले तर? किती मस्त ना. काही साखरेचे पर्यायी पदार्थ आहेत, ज्यांचा शरीराला काहीच तोटा नाही. उलट फायदाच होईल. असे पाच पदार्थ आहेत जे साखरेची कमतरता पूर्ण करू शकतात. वजन वाढण्याच्या चिंतेशिवाय आता गोड खा.(Alternatives To Refined Sugar)
१.गुळ
नैसर्गिक गूळ पचनसंस्थेसाठी चांगला. साखरेची गरज सगळ्यात जास्त चाहाप्रेमींना भासते. गूळाचा चहा चवीलासुद्धा चांगला असतो. लोकं आवडीने पितात. लाडू, शिरा, गोडाचे इतर पदार्थ साखरेऐवजी गूळापासून तयार करा.
२.खजूर
आजकाल खजूराची साखर बाजारात मिळते. घरीच खजूर उकळवून व आटवून त्याचा अर्क तयार करता येतो. खजूर गोडही असतो आणि पौष्टिकही.
३.बदाम
बदामाचे दूध सर्वच सेलेब्रिटीज प्यायला लागले आहेत. बदामाची पावडर बनवून पदार्थांमध्ये वापरता येते. बदाम बुद्धीसाठी फार चांगले.
४.सुखे अंजीर
गोड खाण्याची इच्छा होत असेल तर, अंजीर खा. पोटासाठी, किडनीसाठी अंजीर फायदेशीर आहे. अंजीरचे आईसक्रिम वगैरे आजकाल बाजारात मिळते. घरी तयार करणे ही सोपे.
५.लिक्विड गूळ
बाजारात पातळ गूळ मिळतो. साखरेऐवजी गूळाप्रमाणेच लिक्विड गूळ आजकाल लोक वापरतात. नुसता खायलाही चांगलाच लागतो.
साखरेची कमतरता आयुष्यात असू द्या, पण गोडाची नको. शरीराला सगळ्या चवींची गरज असते. त्यामुळे साखरेऐवजी आता हे पदार्थ वापरा.