Lokmat Sakhi >Food > ग्लासमधली अळूवडी? फक्त १० मिनिटांत होणारी ही आंबट गोड अळूवडी झटपट करा सहज घरी

ग्लासमधली अळूवडी? फक्त १० मिनिटांत होणारी ही आंबट गोड अळूवडी झटपट करा सहज घरी

Alu Vadi: Benefits And How To Prepare The Seasonal Maharashtrian Delicacy कुकरमध्ये वाफवून तयार करा अळूवडी, वेळ वाचेल - चवीलाही भन्नाट लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2023 10:51 AM2023-08-27T10:51:49+5:302023-08-27T12:26:30+5:30

Alu Vadi: Benefits And How To Prepare The Seasonal Maharashtrian Delicacy कुकरमध्ये वाफवून तयार करा अळूवडी, वेळ वाचेल - चवीलाही भन्नाट लागेल

Alu Vadi: Benefits And How To Prepare The Seasonal Maharashtrian Delicacy | ग्लासमधली अळूवडी? फक्त १० मिनिटांत होणारी ही आंबट गोड अळूवडी झटपट करा सहज घरी

ग्लासमधली अळूवडी? फक्त १० मिनिटांत होणारी ही आंबट गोड अळूवडी झटपट करा सहज घरी

महाराष्ट्रीयन पारंपारिक पदार्थ म्हटलं की त्यात अळूवडी आलीच. पावसाळ्यात अळूची पानं बाजारात मोठ्या प्रमाणात मिळतात. अळूची पानं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अळूच्या पानांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम मोठ्या प्रमाणावर असते. ज्यामुळे पचनाच्या संबंधित विविध विकार दूर होतात. महाराष्ट्रात अळूचे २ प्रकार आवर्जून केले जातात. एक म्हणजे अळूचं फदफदं, आणि दुसरी डिश म्हणजे अळूवडी.

अळूवडी खाण्याचा खवय्यावर्ग फार मोठा आहे. सणावाराला आपल्याकडे अळूवडी हमखास केली जाते. अळूवडी करण्याची एकच प्रोसेस आपल्याला ठाऊक असेल, जी वाफवून केली जाते. पण आपल्याला जर झटपट अळूवडी तयार करायची असेल तर, ग्लासचा वापर करून अळूवडी तयार करा. ही हटके रेसिपी तयार कशी करायची पाहूयात(Alu Vadi: Benefits And How To Prepare The Seasonal Maharashtrian Delicacy).

हटके पद्धतीने अळूवडी करण्यासाठी लागणारं साहित्य

अळूची पानं

बेसन

धणे पूड

जीरा पावडर

गरम मसाला

हळद

ओवा

लाल तिखट

जॅकी श्रॉफला आवडते ' कांदा भिंडी ', पाहा त्याने शेअर केलेला खास रेसिपीचा व्हिडिओ

हिंग

पांढरे तीळ

आलं - लसूण - हिरवी मिरची पेस्ट

गुळ

चिंचेचा कोळ

मीठ

पाणी

तेल

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये अडीच कप बेसन घ्या. त्यात दोन चमचे धणे पूड, एक चमचा जीरा पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा ओवा, एक चमचा लाल तिखट, चिमुटभर हिंग, एक चमचा पांढरे तीळ, दोन चमचे आलं - लसूण - हिरवी मिरचीची पेस्ट, २ चमचे गुळ, ४ चमचे चिंचेचा कोळ, चवीनुसार मीठ आणि पाणी घालून सरसरीत बॅटर तयार करून घ्या.

अळूच्या पानांची देठ काढून घ्या. व स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर पानांना रॉल करून चिरून घ्या. चिरलेली अळूची पानं बेसनाच्या सरसरीत बॅटरमध्ये मिक्स करा. आता दोन ग्लास घ्या. ग्लासच्या आत अर्धा चमचा तेल लावून ग्रीस करा. व त्यात तयार बॅटर घाला.

चपात्या वातड-कडक होतात? मऊ-मुलायम चपात्या करण्यासाठी टाळा ५ चुका, चपात्या शिळ्याही राहतील मऊ

कुकरमध्ये २ ग्लास पाणी घालून, त्यावर झाकण ठेऊन कुकर गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात बॅटरने भरलेले दोन्ही ग्लास कुकरमध्ये ठेवा. व कुकरचं झाकण लावा. २ ते ३ शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करा. व बॅटरमध्ये सुरी किंवा टूथपिक घालून, बॅटर शिजले आहे की नाही हे चेक करा. कुकर थंड झाल्यानंतर ग्लास बाहेर काढा, व त्यातून बॅटरही चाकूने बाहेर काढा.

वडी शिजल्यानंतर सुरीने वड्या पाडाव्यात. एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात वडी सोडून, सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. अशा प्रकारे हटके अळूवडी खाण्यासाठी रेडी.

Web Title: Alu Vadi: Benefits And How To Prepare The Seasonal Maharashtrian Delicacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.