Lokmat Sakhi >Food > परफेक्ट अळूवडी करण्याची पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी, श्रावणात तर अळूवडी जेवणात हवीच

परफेक्ट अळूवडी करण्याची पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी, श्रावणात तर अळूवडी जेवणात हवीच

Alu Vadi Traditional Maharashtra Recipe : देवाला नैवेद्य दाखवताना पानात भजी किंवा तळणासोबत अळूच्या वड्या असतातच.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2023 03:51 PM2023-07-27T15:51:42+5:302023-07-27T15:57:39+5:30

Alu Vadi Traditional Maharashtra Recipe : देवाला नैवेद्य दाखवताना पानात भजी किंवा तळणासोबत अळूच्या वड्या असतातच.

Alu Vadi Traditional Maharashtra Recipe : A mouth-watering crisp; Traditional tasty recipe | परफेक्ट अळूवडी करण्याची पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी, श्रावणात तर अळूवडी जेवणात हवीच

परफेक्ट अळूवडी करण्याची पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी, श्रावणात तर अळूवडी जेवणात हवीच

महाराष्ट्रीयन पदार्थ कोणते म्हटल्यावर पुरणपोळी आणि मोदक यांच्यानंतर आवर्जून नाव घेतलं जातं ते मसालेभात आणि अळूच्या भाजीचं. आंबट-गोड चवीची अळूची भाजी म्हणजेच अळूचं फदफदं ही महाराष्ट्रातील एक स्पेशल डीश. करायला काहीशी किचकट पण चवीला तितकीच उत्तम लागणारी ही भाजी महाराष्ट्रीयन लोक तर आवडीने खातातच पण इतर राज्यातले आणि देशातले लोकंही चाटून पुसून ही भाजी फस्त करतात. अळूच्या भाजीची आणखी एक स्पेशल रेसिपी म्हणजे अळूच्या कुरकुरीत चविष्ट अशा वड्या. सणावाराला आपल्याकडे आवर्जून या वड्या केल्या जातात. पावसाळ्याच्या दरम्यान शेतात अळूची पाने मोठ्या प्रमाणात येत असल्याने या काळात देवाला नैवेद्य दाखवताना पानात भजी किंवा तळणासोबत अळूच्या वड्या असतातच. आरोग्यासाठीही अळू अतिशय फायदेशीर असतो (Alu Vadi Traditional Maharashtra Recipe). 

अळूचे फायदे

१. अळूच्या पानांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम मोठ्या प्रमाणावर असते.

२. अळूची पाने व्हिटॅमिन ए, बी आणि सी यांचा मोठा स्त्रोत आहेत. 

३. नजर चांगली होण्यासाठी अळूच्या पानांपासून बनविलेले पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

४. पचनासंबंधीचे विविध विकार, सांधेदुखी दुर करण्यासाठी अळूची भाजी किंवा वड्या खाव्यात.

(Image : Google)
(Image : Google)

५. अळूच्या पानांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अळू आवर्जून खावा.

६. अळूची पाने आणि कंद यामध्ये असणाऱ्या पदार्थांमुळे कशाचीही ॲलर्जी होत नाही. त्यामुळे आजारी माणसांनाही अळू खाण्याचा सल्ला दिला जातो. 

अळूच्या वड्यांची रेसिपी

साहित्य -

१. अळूची पाने - ८

२. बेसन - साधारण ६ चमचे

३. तांदळाचे पीठ -४ चमचे

४. तीळ -२ चमचे

५. तिखट -१ चमचा

६. गोडा मसाला - अर्धा चमचा

७. हळद -अर्धा चमचा

८. मीठ - चवीनुसार

९. कोथिंबीर - अर्धी वाटी 

१०. चिंच आणि गुळाचा कोळ - अर्धी वाटी 

११. तेल - १ वाटी 

कृती  -

१. अळूची पाने स्वच्छ धुवून पुसून घ्यावीत आणि सुरीने त्याचे मधले देठ कापून पान एकसारखे होईल असे पाहावे.

२. एका मोठ्या बाऊलमध्ये डाळीचे पीठ, तांदळाचे पीठ, तिखट, मीठ, तीळ, मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर एकत्र करावे.


३. एका वाटीत चिंचेचा कोळ काढून त्यात गूळ घालावा.

४. पीठाच्या मिश्रणात हा कोळ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून सरबरीत असे मिश्रण तयार करावे. 

५. अळूचे एक पान घेऊन त्यावर हाताने हे मिश्रण सगळीकडे एकसारखे लावावे.

६. त्यावर दुसरे पान घालून त्या पानालाही मिश्रण लावावे.

७. मग ही पाने गोलाकार वळून घेऊन कुकरमध्ये किंवा एका पातेल्यावर चाळणी ठेवून उकडायला ठेवावीत. 

८. उकडून थोडे गार झाले की याच्या सुरीने वड्या पाडाव्यात आणि मग त्या तेलातून खरपूस तळून घ्याव्यात.
 

Web Title: Alu Vadi Traditional Maharashtra Recipe : A mouth-watering crisp; Traditional tasty recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.