अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणून अळू ओळखला जातो. गौरी- गणपती किंवा इतर सणांना अनेक घरांमध्ये आवर्जून अळूवडी केली जाते. आता तर वर्षभर अळू मिळतो. पण तरीही पावसाळ्यातच अळू खावा, असे सांगितले जाते. आरवी किंवा धोपा या नावानेही अळू ओळखली जाते. महाराष्ट्रात जवळपास सगळ्याच भागात पावसाळ्याच्या दिवसात अगदी सहजपणे अळू मिळते. अळूची पाने आपल्या बागेतल्या छोट्या कुंडीतही अगदी उत्तमप्रकारे वाढू शकतात. अळूच्या पानांमध्ये कॅल्शियम ऑक्झिलेट रेफॉईड्स असते. त्यामुळे बऱ्याचदा अळूची वडी किंवा भाजी खाल्ली की घसा खवखवतो.
अळू खाल्ल्याने होणारे फायदे१. अळूच्या पानांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम मोठ्या प्रमाणावर असते.२. अळूची पाने व्हिटॅमिन ए, बी आणि सी यांचा मोठा स्त्रोत आहेत. ३. नजर चांगली होण्यासाठी आळूच्या पानांपासून बनविलेले पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.४. पचनासंबंधीचे विविध विकार, सांधेदुखी दुर करण्यासाठी आळूची भाजी किंवा वड्या खाव्यात.५. अळूच्या पानांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अळू आवर्जून खावा.६. अळूची पाने आणि कंद यामध्ये असणाऱ्या पदार्थांमुळे कशाचीही ॲलर्जी होत नाही. त्यामुळे आजारी माणसांनाही अळू खाण्याचा सल्ला दिला जातो.
अळुच्या पानांची वडी करण्याची कृतीसाहित्य
- शिरा काढून टाकलेली अळूची पाने
- चिंचेचा कोळ
- गुळ
- तिखट
- मीठ
- गोडा मसाला
- धने- जिरे पावडर
- अद्रक- लसून पेस्ट
- कोथिंबीर
- बेसन
डोकेदुखीसह अनेक आजारांना पळवून लावणारी रानभाजी करटोली, ही भन्नाट रेसिपी करून तर बघा...https://www.lokmat.com/sakhi/food/try-yummy-receipe-vegetable-kartoli-a602/
कृती१. सगळ्यात आधी तुम्हाला जेवढ्या वड्या करायच्या आहेत, तेवढे पीठ घ्या. २. पिठामध्ये वरील सर्व मिश्रण टाका आणि पाणी टाकून पीठ भजे करताना भिजवतो, तसे सैलसर भिजवून घ्या. ३. भिजवलेले पीठ थोडे हातावर घ्या आणि एका ताटावर पसरवा.४. या पीठावर अळूचे पान पसरवा व पानावरून पुन्हा पिठाचा हात फिरवा.५. आता एका टोकाने सुरूवात करून अळूचे पान तळहाताने गोल- गोल फिरवत त्याचा रोल करा. ६. अशा पद्धतीने सगळी पाने केली, की ती वाफेवर चांगली शिजवून घ्या.७. नंतर त्याचे तुम्हाला आवडतील त्याप्रमाणात बारीक काप करा आणि या वड्या तळून घ्या. वड्या तव्यावर तेल टाकून शॅलोफ्राय केल्या तरी चालतात.