Lokmat Sakhi >Food > गाजराचे एक नाही तर अनेक फायदे, समजल्यावर तुम्हीही दररोज खाण्यास कराल सुरुवात

गाजराचे एक नाही तर अनेक फायदे, समजल्यावर तुम्हीही दररोज खाण्यास कराल सुरुवात

गाजर आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. गाजर डोळ्यांसाठी आणि एकूण आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 14:46 IST2025-01-30T14:45:01+5:302025-01-30T14:46:24+5:30

गाजर आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. गाजर डोळ्यांसाठी आणि एकूण आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

amazing health benefits of eating carrots in winters | गाजराचे एक नाही तर अनेक फायदे, समजल्यावर तुम्हीही दररोज खाण्यास कराल सुरुवात

गाजराचे एक नाही तर अनेक फायदे, समजल्यावर तुम्हीही दररोज खाण्यास कराल सुरुवात

गाजर आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. गाजर डोळ्यांसाठी आणि एकूण आरोग्यासाठी उपयुक्त आहे. गाजरांबद्दलची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही ते अनेक प्रकारे खाऊ शकता. जसं की गाजराचा हलवा, ज्यूस,कोशिंबीर, लोणचे, भाजी इ. गाजरांमध्ये फॅट्स प्रमाण खूप कमी आहे. अनेक पोषक तत्वांनी ते समृद्ध आहे. त्यात व्हिटॅमिन ए,सी, के, बी८, फायबर, बीटा कॅरोटीन, पोटॅशियम, आयर्न, मॅंगनीज, कॉपर, पॅन्टोथेनिक एसिड असतं. गाजर खाण्याचे फायदे जाणून घेऊया.

डोळ्यांसाठी फायदेशीर 

गाजर डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. कारण त्यात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि अल्फा-कॅरोटीन आणि बीटा-कॅरोटीन नावाचे दोन कॅरोटीनॉइड असतात. पण गाजरांमध्ये फक्त एकच पोषक तत्व नाही तर डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असलेले अनेक पोषक तत्व असतात. गाजरांमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जातात. ते डोळ्यांच्या रेटिना आणि लेन्ससाठी चांगले आहे. दररोज एक गाजर खा, ते आरोग्यासाठी चांगलं आहे.

शुगर मॅनेज करतं

गाजरांमध्ये भरपूर फायबर असतं, जे रक्तातील शुगर आणि इन्सुलिनसाठी खूप चांगलं असतं. कच्च्या किंवा किंचित शिजवलेल्या गाजरांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, जो शुगर बॅलेन्स करण्यास मदत करतो. मधुमेहाचे रुग्ण आरामात गाजर खाऊ शकतात.

वजन कंट्रोल करण्यासाठी फायदेशीर 

गाजरांची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यात ८८ टक्के पर्यंत पाणी असतं. त्यात फायबर आणि रफेज असतात. ज्यामुळे वजन कंट्रोलमध्ये राहतं. याशिवाय, जर तुम्ही दररोज एक गाजर खाल्लं तर तुम्ही सुमारे ८० टक्के कॅलरीज खाता, ज्यामुळे तुमचं पोट बराच वेळ भरलेले वाटतं. 

ब्लड प्रेशरसाठी उपयुक्त

जर तुमचं ब्लड प्रेशर जास्त असेल तर तुम्ही दररोज एक गाजर खावं. गाजरांमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असतं. जे ब्लड प्रेशर बॅलेन्स करण्याचं काम करतं. शिवाय, ते शरीरातील सोडियमची लेव्हरल बॅलेन्स करतं. हृदय निरोगी ठेवण्यासाठी गाजर खूप चांगलं असतं.

Web Title: amazing health benefits of eating carrots in winters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.