Lokmat Sakhi >Food > विकतची महागडी आमचूर पावडर नको, फक्त १०० रुपयांत करा वर्षभर टिकणारी आमचूर पावडर, घ्या रेसिपी...

विकतची महागडी आमचूर पावडर नको, फक्त १०० रुपयांत करा वर्षभर टिकणारी आमचूर पावडर, घ्या रेसिपी...

Amchur Powder Recipe : How To Make Amchur Powder At Home : Amchur Powder : Dry Mango Powder : Homemade Amchoor Powder Recipe : आमचूर पावडर विकत घेण्यात अजिबात पैसे घालवू नका, त्यापेक्षा ही रेसिपी पाहा आणि वाटेल तेवढी पावडर करून ठेवा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2025 19:57 IST2025-04-24T19:33:07+5:302025-04-24T19:57:35+5:30

Amchur Powder Recipe : How To Make Amchur Powder At Home : Amchur Powder : Dry Mango Powder : Homemade Amchoor Powder Recipe : आमचूर पावडर विकत घेण्यात अजिबात पैसे घालवू नका, त्यापेक्षा ही रेसिपी पाहा आणि वाटेल तेवढी पावडर करून ठेवा..

Amchur Powder Recipe How To Make Amchur Powder At Home Dry Mango Powder Homemade Amchoor Powder Recipe | विकतची महागडी आमचूर पावडर नको, फक्त १०० रुपयांत करा वर्षभर टिकणारी आमचूर पावडर, घ्या रेसिपी...

विकतची महागडी आमचूर पावडर नको, फक्त १०० रुपयांत करा वर्षभर टिकणारी आमचूर पावडर, घ्या रेसिपी...

उन्हाळा म्हटलं की हिरव्यागार कैरीचा सिझन. बाजारांत प्रत्येक ठेल्यावर ठेवलेल्या हिरव्यागार कैऱ्या पाहून त्या विकत घेण्याचा मोह कुणालाही आवरता येत नाही. या दिवसांत (Amchur Powder Recipe) प्रत्येक घराघरात हमखास कैरीचे वेगवेगळे पदार्थ केले जातात. कैरीचं लोणचं, पन्हं, साखरआंबा, गुळांबा, मेथांबा, कैरीची चटणी असे अनेक पदार्थ वर्षभर पुरतील इतके (How To Make  Amchur Powder At Home) एकदमच करून स्टोअर केले जातात. या सगळ्या (Dry Mango Powder) पदार्थांबरोबरच काही घरांमध्ये कैरीची आमचूर पावडर देखील वर्षभर पुरेल इतक्या मोठ्या प्रमाणावर तयार केली जाते(Homemade Amchoor Powder Recipe).

बऱ्याचदा कैरीचा हंगाम निघून गेला की आपल्याला आमचूर पावडरची आठवण येते आणि मग महागडी पावडर विकत घ्यावी लागते. खरंतर, आमचूर पावडर आपण डाळ, आमटी, सांबार अशा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये घातल्यास त्याची चव वाढते. त्यामुळे रोजच्या स्वयंपाकात वापरली जाणारी आमचूर पावडर तर हवीच...अशावेळी विकतची महागडी आमचूर पावडर आणण्यापेक्षा यंदाच्या उन्हाळ्यात वर्षभर पुरेल इतकी आमचूर पावडर तयार करून स्टोअर करू शकतो. घरच्याघरीच आमचूर पावडर करण्याची सोपी रेसिपी पाहूयात. 

घरच्याघरीच आमचूर पावडर कशी करायची ?

आपण जेव्हा बाजारांतून विकतची आमचूर पावडर आणतो तेव्हा तिची किंमत खूप जास्त असते. त्यामुळे अगदी स्वस्तामध्ये ही पावडर तयार होत असताना त्यासाठी एवढे पैसे घालविण्याची गरजच नाही. आमचूर पावडर तयार करण्यासाठी जर तुम्ही तुमच्या बागेतील झाडावरील कैऱ्या आणल्या तर अगदी फुकटात आमचूर पावडर तयार करता येऊ शकते. 

आमचूर पावडर करण्यासाठी अगदी हिरव्यागार कैऱ्या निवडा. पिवळट पडत चाललेल्या कैऱ्या घेऊ नका. कैऱ्या व्यवस्थित धुवून स्वच्छ करा आणि त्यांची सालं काढून घ्या.

फरसाणची चटणी कधी खाल्ली आहे? ५ मिनिटांत करा फरसाणची कुरकुरीत चटणी-पाहा रेसिपी...

आंबा चिरण्याच्या ७ पद्धती, प्रत्येक फोडीप्रमाणे वेगळी लागेल आंब्याची चव! पाहा कशासाठी - कसा चिराल आंबा...

यानंतर, बटाटयाची सालं ज्याप्रमाणे आपण सोलतो अगदी नेमकं त्याचप्रमाणे कैरीची सालं स्लाईसरने काढून घ्यावी. मग त्याच स्लाईसरने कैरीचे पातळ काप करून घ्यावेत. किंवा आपण कैरी थेट किसणीवर देखील किसू शकता.  

कैरीचा किस किंवा काप एका मोठ्या ताटात पसरवून ठेवा आणि कडक उन्हात २ ते ३ दिवस चांगले वाळवून घ्या.  

जेव्हा कैरीमधला ओलसरपणा पुर्णपणे निघून जाईल तेव्हा त्या मिक्सरमध्ये घालून त्याची अगदी बारीक पावडर करून घ्या.

फक्त १० मिनिटांत करा आंब्याचा मऊ - लुसलुशीत शिरा, एकदा कराल टेस्ट तर म्हणाल बेस्ट...

अशाप्रकारे तुमची वर्षभर टिकणारी आमचूर पावडर तयार आहे. ही आमचूर पावडर तुम्ही एका काचेच्या बरणीत भरून वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता. 

वर्षभरातून अधून - मधून २ ते ३ वेळा ही आमचूर पावडर उन्हांत व्यवस्थित वाळवून घेतल्याने ती अधिक चांगली व दीर्घकाळ टिकते.  


Web Title: Amchur Powder Recipe How To Make Amchur Powder At Home Dry Mango Powder Homemade Amchoor Powder Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.