सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे बाजारात कैऱ्या भरपूर प्रमाणात मिळत आहेत. कैरीचं लोणचं, पन्हं, तक्क, साखरआंबा, गुळांबा, मेथांबा असं काय काय आपण करत असतो. काही जणींकडे तर आणखी वेगवेगळ्या रेसिपी असतात.. त्यापैकीच एक आहे आमचूर पावडर. बऱ्याचदा कैरीचा हंगाम निघून गेला की आपल्याला आमचूर पावडरची आठवण येते आणि मग महागडी पावडर विकत घ्यावी लागते. म्हणूनच आता ही रेसिपी पाहा (amchur powder recipe) आणि लगेचच आमचूर पावडर करण्याच्या तयारीला लागा..(benefits and uses of amchur powder )
आमचूर पावडर करण्याची रेसिपी
बाजारातून आपण जेव्हा १०० ग्रॅम, २०० ग्रॅम आमचूर पावडर आणतो, तेव्हा तिची किंमत खूप जास्त असते. त्यामुळे अगदी स्वस्तामध्ये ही पावडर तयार होत असताना त्यासाठी एवढे पैसे घालविण्याची गरजच नाही.
फक्त २ पदार्थ चेहऱ्यावर चोळा- अदिती राव हैदरी सांगतेय ग्लोईंग त्वचेसाठी साध्या- सोप्या ब्यूटी टिप्स
ज्यांच्याकडे घरच्या कैऱ्या आहेत, त्यांना आमचूर पावडरसाठी एक पैसाही देण्याची गरज नाही.
आमचूर पावडर करण्यासाठी अगदी हिरव्यागार कैऱ्या निवडा. पिवळट पडत चाललेल्या कैऱ्या घेऊ नका. कैऱ्या व्यवस्थित धुवून स्वच्छ करा आणि त्यांची सालं काढून घ्या.
यानंतर एकतर मोठ्या किसनीने कैरी किसून घ्या किंवा मग त्याच्या बारीक बारीक चकत्या, फोडी करा.
कैरीचा किस किंवा फोडी एका मोठ्या ताटात पसरवून ठेवा आणि कडक उन्हात २ ते ३ दिवस चांगले वाळवून घ्या.
हरबऱ्यांना लगेच भुंगा लागतो- वाया जातात? ४ सोपे उपाय, महिनोंमहिने हरबऱ्यांना किड लागणार नाही
जेव्हा कैरीमधला ओलसरपणा पुर्णपणे निघून जाईल तेव्हा त्या मिक्सरमध्ये घाला आणि त्याची अगदी बारीक पावडर करून घ्या.
ही झाली तुमची आमचूर पावडर तयार. अगदी २ कैऱ्यांची आमचूर पावडर तयार केली तरी ती वर्षभर पुरते.
आमचूर पावडरचे उपयोग
१. लिंबाच्या ऐवजी तुम्ही आमचूर पावडर वापरू शकता.
रंगरूपावरून ट्रोल झालेली टॉपर प्राची निगमचा सल्ला, मुलींनो जे बिघडलेलेच नाही ते दुरुस्त का करता?
२. कधी कधी वरणात किंवा एखाद्या भाजीमध्ये आमचूर पावडर घातली की पदार्थाची चव आणखी वाढते.
३. सॅलेडमध्ये लिंबाच्या, दह्याच्या जागी आमचूर पावडर घातल्याने सॅलेडचा, कोशिंबीरींचा स्वाद आणखी खुलतो.