Potato Benefits : बटाटे ही एक अशी भाजी आहे जी जगभरातील लोक आवडीनं खातात. बटाट्याची केवळ भाजीच नाही तर वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. अमेरिकेत बटाटे सगळ्यात जास्त खाल्ले जातात. येथील लोक रोज भरपूर प्रमाणात पांढऱ्या बटाट्यांचे वेगवेगळे पदार्थ खातात. एका अंदाजानुसार, अमेरिकेत खाल्ल्या जाणाऱ्या भाज्यांमध्ये बटाट्यांचं प्रमाण २२ टक्के आहे.
बटाट्यांमध्ये प्रोटीन, कार्ब्स, फायबर, व्हिटॅमिन सी, बी६, पोटॅशिअम आणि मॅगनीजसारखे अनेक पोषक तत्व असतात. अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, बटाट्यांमध्ये आढळणारे पोषक तत्व शरीर फिट आणि हेल्दी ठेवतात. पण जर बटाटे जास्त प्रमाणात खाल्ले तर हाय बीपी, वेट गेन, एलर्जी, पचनासंबंधी समस्या होऊ शकतात.
बीपी आणि कॅन्सरपासून बचाव
बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं की, बटाटे खाल्ल्यानं हाय ब्लड प्रेशर कंट्रोल केलं जाऊ शकतं. त्याशिवाय एका रिसर्चमधून समोर आलं की, बटाट्यामधील अॅंटी-ऑक्सिडेंट लिव्हर आणि पोटाच्या कॅन्सर सेल्सचा विकास कमी करण्यास मदत करतात.
बटाट्याचे फायदे आणि नुकसान
एका रिपोर्टनुसार, बटाट्यामध्ये असे अनेक खनिज आणि प्लांट कम्पाउंड असतात जे ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करतात. बटाटे खाऊन तुम्ही वजनही कंट्रोल करू शकता. कारण बटाटे खाल्ल्यानंतर पोट जास्त वेळ भरलेलं राहतं.
पांढरे बटाटे खाल्ल्यानं वजन वाढण्याचाही धोका अधिक असतो. सोबतच यात कार्बोहायड्रेट्स जास्त असतात, जे ब्लड शुगर लेव्हल वाढवू शकतात. त्यामुळेच डायबिटीसच्या रूग्णांना बटाटे न खाण्याचा सल्ला दिला जातो. अशात बटाटे खाण्याचे काही फायदे आणि नुकसान जाणून घेऊ.
पचन तंत्र मजबूत राहतं
बटाट्यामधील स्टार्च पचन तंत्र सुधारण्यास मदत करतं. यात फायबरचं प्रमाण अधिक असतं, जे पचन तंत्र चांगलं ठेवून बद्धकोष्ठतेची समस्या दूर करतं. सोबतच बटाटे खाल्ल्यानं एनर्जी लेव्हलही वाढते. यातील कार्बोहायड्रेट्सएनर्जी बूस्ट करण्याचं काम करतात.
वजन वाढवण्यास मदत
जर तुमचं वजन कमी असेल आणि तुम्हाला वाढवायचं असेल तर बटाटे खाऊ शकता. कारण यात कॅलरीचं प्रमाण भरपूर असतं. ज्यामुळे वजन वाढण्यास मदत मिळते.
बीपीची होऊ शकते समस्या
बटाटे जास्त प्रमाणात खाल्ले तर तुमचं ब्लड प्रेशर वाढू शकतं. अशात बीपीच्या रूग्णांनी बटाटे कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच निळ्या रंगाचे किंवा कोंब आलेले बटाटे खाल्ल्यानं शरीरात एलर्जी होऊ शकते.
डाइजेस्टिव प्रॉब्लेम्स
बटाटे उष्ण असतात. अशात हे जास्त खाल्ल्यास उलटी किंवा जुलाब लागण्याची समस्या होऊ शकते. त्याशिवाय या भाजीमध्ये कॅलरीचं प्रमाण अधिक असतं, ज्यामुळे वजन वाढू शकतं. त्यामुळे जर वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर बटाटे खाऊ नका.