Join us  

बच्चन कुटुंबात वाढदिवसाला करतात तो मिल्क केक असतो कसा? पाहा रेसिपी-हव्या फक्त ३ गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2024 4:40 PM

Amitabha Bachchan Favorite Milk Cake Only 2 Ingredients : मिल्क केक करणं सोपं नाही असं वाटत असेल तर ही घ्या रेसिपी

केक कटिंग करून वाढदिवस साजरा करण्याची परंपरा अनेकांकडे आहे (Amitabh Bachchan). पण बिग बी अर्थात अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या घरात केक कट करत नाही (Food). असं अभिनेत्री जया बच्चन यांनी 'कौन बनेगा करोड़पति'च्या एका भागात सांगितलं होतं. शिवाय वाढदिवसानिमित्त आपण छोटंसं गीत देखील गातो (Cooking Tips). पण बच्चन फॅमिलीमध्ये 'वर्ष नव, हर्ष नव, जीवन उत्कर्ष नव' हे गीत गाण्याची परंपरा आहे. केक कटिंगऐवजी बच्चन फॅमिलीमध्ये मिल्क केक खातात. मिल्क केक ही एक इंडिअन स्वीट डिश आहे. जी अनेकांकडे तयार केली जाते.

मिठाईच्या दुकानात मिल्क केक सहज उपलब्ध आहे. पण घरात मनासारखा दाणेदार मिल्क केक तयार होत नाही. जर आपल्याला दाणेदार गोडसर मिल्क केक करायचं असेल तर, ही रेसिपी नक्कीच फॉलो करून पाहा(Amitabha Bachchan Favorite Milk Cake Only 2 Ingredients).

मिल्क केक करण्यासाठी लागणारं साहित्य

दूध

साखर

मुलांच्या बळकट हाडांसाठी फक्त दूध पुरेसं नाही, चमचाभर ‘ही’ पावडर दुधात घाला, हाडं होतील मजबूत

सायट्रिक अॅसिड

वेलची पूड

अशा पद्धतीने तयार करा मिल्क केक

मिल्क केक करण्यासाठी सर्वात आधी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवा. नंतर त्यात अर्धा लिटर दूध घाला. गॅस मध्यम आचेवर ठेवा. दुधाला उकळी फुटल्यानंतर त्यात अर्धा छोटा चमचा सायट्रिक अॅसिड, २ चमचे साखर घालून ढवळत राहा. दूध आटत जाईल.

पावसाळ्यात कुरमुरे सादळतात? ४ टिप्स; कुरमुऱ्याचा चिवडा करा मस्त कुरकुरीत

काही वेळानंतर पुन्हा त्यात २ चमचे साखर घाला. दूध पूर्णपणे आटल्यानंतर त्यात एक चमचा वेलची पूड घाला. दूध आटल्यानंतर गॅस बंद करा. एका बाऊलमध्ये बारीक चिरलेले ड्रायफ्रुट्स घालून पसरवा. त्यावर तयार आटलेल्या दुधाचे मिश्रण घालून पसरवा. काही वेळासाठी फ्रिजमध्ये सेट करण्यासाठी ठेवा.

सेट झाल्यानंतर आपण त्यावर बारीक चिरलेले ड्रायफ्रुट्स घालून पसरवू शकता. अशा प्रकारे मिल्क खाण्यासाठी रेडी. आपण हा केक येणाऱ्या रक्षा बंधनानिमित्तही तयार करू शकता.

टॅग्स :अमिताभ बच्चनअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स