Lokmat Sakhi >Food > Amla Benefits In Winters : हिवाळ्यात आवळा खाऊन आजारांना ४ हात लांब ठेवा; वाचा आवळ्याचे जबरदस्त फायदे

Amla Benefits In Winters : हिवाळ्यात आवळा खाऊन आजारांना ४ हात लांब ठेवा; वाचा आवळ्याचे जबरदस्त फायदे

Amla Benefits In Winters : आवळा व्हिटॅमिन-सी, ए, पॉलिफेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्सने समृद्ध आहे. जे तुम्हाला अनेक प्रकारच्या संसर्गांपासून तर वाचवतेच, शिवाय रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत करते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 12:20 PM2021-11-11T12:20:46+5:302021-11-11T12:36:50+5:30

Amla Benefits In Winters : आवळा व्हिटॅमिन-सी, ए, पॉलिफेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्सने समृद्ध आहे. जे तुम्हाला अनेक प्रकारच्या संसर्गांपासून तर वाचवतेच, शिवाय रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत करते.

Amla Benefits In Winters : Health add amla in 5 ways to your diet in winters for amazing benefits | Amla Benefits In Winters : हिवाळ्यात आवळा खाऊन आजारांना ४ हात लांब ठेवा; वाचा आवळ्याचे जबरदस्त फायदे

Amla Benefits In Winters : हिवाळ्यात आवळा खाऊन आजारांना ४ हात लांब ठेवा; वाचा आवळ्याचे जबरदस्त फायदे

वातावरणातील गारवा दिवसेंदिवस वाढत आहे. स्वेटर घालणे, हॉट चॉकलेट पिणे आणि रात्री चित्रपट पाहणे या सगळ्यात किती मजा असते, नाही का? (Winter Care Tips)  या ऋतूमध्ये कोरडी त्वचा, सर्दी, खोकला आणि हवामानातील बदलाशी संबंधित समस्या देखील येतात. त्यामुळे या ऋतूत आहाराचीही काळजी घेणे गरजेचे आहे. हिवाळ्यात संतुलित आहारासोबतच तुम्ही आवळ्याच्या सेवनानं आजारांना स्वत:पासून लांब ठेवू शकता. (Amla Benefits In Winters)

आवळा व्हिटॅमिन-सी, ए, पॉलिफेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्सने समृद्ध आहे. जे तुम्हाला अनेक प्रकारच्या संसर्गांपासून तर वाचवतेच, शिवाय रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत करते. इंटरनॅशनल जर्नल ऑफ फार्मास्युटिकल्समध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की आवळ्यामध्ये मजबूत बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे साथीचे आजार टाळता येतात. 

याशिवाय आवळा तुमच्या त्वचेचे आरोग्य सुधारण्यास आणि ते हायड्रेट करण्यातही मदत करतो. आणि जर तुम्हाला तंदुरुस्त राहायचे असेल तर या सुपरफूडपेक्षा चांगले काहीही नाही कारण ते वजन कमी करण्यास प्रोत्साहन देते. चला तर मग जाणून घेऊया आहारात आवळा कसा समाविष्ट करता येईल?

1) तुम्ही रोज एक आवळा किसून, भाज्या आणि सॅलडमध्ये घालू शकता किंवा असेच खाऊ शकता. आवळा खूप आंबट वाटत असेल तर त्यात मीठ आणि हळद घालून खाऊ शकता.

2) याशिवाय आवळ्याचे लोणचे किंवा रस पिऊ शकता. जर तुम्हाला मिठाई आवडत असेल तर तुम्ही त्याचा मुरंब्बा देखील खाऊ शकता.

3) गाजर आणि आवळ्याचा रस देखील प्यायला जाऊ शकतो. गाजरात भरपूर बीटा-कॅरोटीन असते, जे शरीरात व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते. व्हिटॅमिन-ए आणि सी यांचे मिश्रण शरीराला चांगेल ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते.

४) याशिवाय आवळ्याचा रस काढून त्यात गूळ, जिरं आणि काळी मिरी पावडर टाकून चांगले मिसळा.
 

Web Title: Amla Benefits In Winters : Health add amla in 5 ways to your diet in winters for amazing benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.