Join us  

गारठ्याच्या थंडीत घरगुती आवळा कँडी खाऊन ठेवा स्वतःला फिट अँड फाईन, घ्या आवळा कँडीची सोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2023 5:04 PM

Sweet Amla Candy : Dried Amla Candy : Indian Gooseberry candy :Sugar Amla Candy : आवळा कँडी बनविण्याची सोपी रेसिपी... घरीच बनवा बाजारात मिळते तशी रसरशीत आंबट - गोड आवळा कँडी...

थंडीच्या या सिजनमध्ये बाजारात टपोरे आवळे दिसू लागले आहेत. ते पाहूनच तोंडाला पाणी सुटतं, गोल गलगरीत, मोठाले आवळे पाहूनच आवळ्याचा मुरंबा, आवळ्याचं लोणचं, आवळा कँडी (Dried Amla Candy) अशा वेगवेगळ्या पदार्थांची आठवण येऊ लागते. आवळा हा आरोग्याच्या अनेक समस्यांवरील उत्तम औषध आहे हे आपल्याला माहित आहे. मात्र तरीही आपल्याकडून म्हणावा तितका हा पदार्थ नियमित खाल्ला जात नाही. आवळा हा पॉलीफेनॉल आणि व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्रोत आहे, यामुळे पचनक्रिया सुधारण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. आवळ्यातील गुणधर्म तणावापासून दूर राहण्यास मदत करतात. तसेच केस आणि त्वचेच्या सौंदर्यासाठीही आवळा आवर्जून खाल्ला जातो. चवीला आंबट, तुरट आणि थोडासा गोड असा आवळा अनेकांना आवडतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी आवर्जून आवळा खायला हवा(Awala Candy recipe).

आयुर्वेदामध्ये आवळ्याला विशेष महत्त्व असून त्याचे बरेच फायदेही सांगितले आहेत. उन्हाळ्यात होणारे आम्लपित्त, लघवी साफ न होणे, पचनाच्या किंवा पोटाच्या तक्रारींवर आवळा कँडी खाणे फायदेशीर असते. तसेच आवळा खाल्ल्याने उन्हामुळे होणारी मळमळ कमी होते, तरतरी येते. आवळ्याचे मोरावळा, सरबत, लोणचे, कँडी, सुपारी असे बरेच प्रकार होतात. सध्या धकाधकीचे जीवन असल्याने आपल्यातील अनेकजण बाजारात रेडीमेड मिळणारे पदार्थ घेणे पसंत करतात. पण घरीही अगदी विकतच्यासारखी आवळा कँडी (Indian Gooseberry Candy) सहज करता येते. पाहूयात आवळा कँडीची सोपी रेसिपी(How to Make Amla Candy).

साहित्य :- 

१. आवळा - १/२ किलो२. पाणी - २ कप ३. साखर - १/२ कप ४. पिठीसाखर - १ टेबलस्पून 

चीज शंकरपाळे यंदा दिवाळीत करून तर पाहा, पदार्थ असा सरस की दिवाळी यादगार - पाहा रेसिपी...

फराळाची राणी नाजूक चंपाकळी ! पारंपरिक सुंदर गोड पदार्थ दिवाळीत करा नक्की, पाहा रेसिपी...

कृती :- 

१. सगळ्यांत आधी आवळे स्वच्छ धुवून घ्यावेत. २. आता एका भांड्यात पाणी घेऊन त्यात हे आवळे घालून १५ ते २० मिनिटे उकळवून घ्यावेत. ३. उकळवून शिजवून घेतलेल्या या आवळ्याच्या लहान लहान फोडी करुन घ्याव्यात. ४. आता एक काचेची बरणी घेऊन त्या बरणीत या आवळ्याच्या फोडी घालून त्यावर साखर घालावी. साखर घातल्यानंतर बरणीचे झाकण गच्च बंद करून घ्यावे. 

दिवाळी स्पेशल मेथीच्या खाऱ्या पुऱ्या, गोड गोड खाऊन कंटाळा आला तर मस्त चटपटीत पर्याय...

ना भाजणी बनवायचे टेंन्शन, ना तेलात चकली विरघळण्याची झंझट, १० मिनिटात करा, स्पिन्याच बटर चकली...

५. आता संपूर्ण एक दिवस ही बरणी तशीच ठेवून द्यावी. त्यातील साखर विरघळून त्याचा पाक तयार होईल. या पाकात आवळ्याच्या फोडी व्यवस्थित भिजतील याची काळजी घ्यावी. ६. आवळे साखरेच्या पाकात भिजल्यानंतर एक गाळण घेऊन पाक गाळून घ्यावा. ७. त्यानंतर या आवळ्याच्या फोडी एक एक करून ताटात ठेवाव्यात. ८. आता हे ताट २ दिवस उन्हांत ठेवून या आवळा कँडी व्यवस्थित सुकवून घ्या. ९. सुकवून घेतल्यानंतर त्यावर थोडीशी पिठीसाखर भुरभुरवून घ्यावी. 

आता आपल्या आवळा कँडी खाण्यासाठी तयार आहेत. या आवळा कँडी एका हवाबंद डब्यात भरून व्यवस्थित स्टोअर करुन ठेवाव्यात.

टॅग्स :अन्नपाककृती