हिवाळ्यात बाजारांमध्ये हिरवेगार, टप्पोरे आवळे मोठ्या प्रमाणात विकायला ठेवलेले असतात. हे आवळे बघून ते विकत घेण्याचा मोह आपल्याला आवरता येत नाही. आंबट - गोड चवीचा आवळा विकत घेतला की त्याचे वेगवेगळे पदार्थ हमखास प्रत्येक घरी तयार केले जातात. आवळ्याच्या वेगवेगळ्या चविष्ट पदार्थांपैकी सगळ्यात कॉमन (Amla Chutney Recipe) आणि आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे आवळ्याची चटणी. आवळा, खोबरं, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर वापरुन केली जाणारी हिरवी चटणी (How To Make Amla Chutney At Home) तर करतोच. परंतु आवळ्याची जरा नेहमीपेक्षा हटके आणि चमचमीत, चटपटीत, मसालेदार चटणी हिवाळ्यात खाल्ली नाही, हिवाळा अधूराच वाटतो( Gooseberry Spicy Chutney recipe).
व्हिटॅमिन सी आणि ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असलेलं हे फळ एरवी वर्षभर चाखायला मिळत नाही. त्यामुळे सध्या बाजारात फ्रेश आवळे मिळत आहेत, तर त्याचा पुरेपूर उपयोग आरोग्यासाठी करून घ्यायला हवा. आवळ्याचे वेगवेगळे पदार्थ अनेकजणी नेहमीच करतात. आता यावेळी ही खास रेसिपी वापरून आवळ्याची मस्त मसालेदार, झणझणीत चटणी करून बघा. आवळ्याची चटपटीत चटणी करण्याची खास रेसिपी. तोंडी लावण्यासाठी म्हणून आवळ्याचा एक खास नवा पदार्थ नक्की ट्राय करून पाहा.
साहित्य :-
१. आवळा - १५ ते २०
२. तेल - ३ ते ४ टेबलस्पून
३. मोहरी - १ टेबलस्पून
४. जिरे - १ टेबलस्पून
५. आलं - १ टेबलस्पून (किसलेलं)
६. कडीपत्ता - ७ ते ८ पाने
८. ओली आंबेहळद - १/२ कप (किसलेली)
९. बीटरूट - १/२ कप (किसलेले)
१०. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून
११. मीठ - चवीनुसार
१२. गूळ पावडर - १ कप
क्षिती जोगला फार आवडते आजीच्या हातचे आंबट वरण! पाहा आंबट वरणाची पारंपरिक रेसिपी...
पारंपरिक हुरडा थालीपीठ आवडतं, ‘असं’ हुरडा धिरडंही करुन पाहा, पोटभर-पौष्टिक खाण्याचं सुख...
कृती :-
१. सगळ्यांत आधी आवळे स्वच्छ धुवून पुसुन कोरडे करून घ्यावेत. आवळे धुवून घेतल्यानंतर त्याच्या बिया काढून लहान लहान फोडी करून घ्याव्यात.
२. आता या आवळ्याच्या लहान फोडी पाण्यांत घालूंन उकळवून घ्याव्यात. (आवळा उकडवून घेतलेले पाणी फेकून न देता एका बाऊलमध्ये काढून ठेवावे).
३. एका मोठ्या भांड्यात तेल घेऊन त्यात फोडणीसाठी जिरे, मोहरी घालावी. त्यानंतर त्यात किसलेली ओली आंबेहळद, किसलेल बीटरुट, कडीपत्ता घालावा.
४. आता या तयार खमंग फोडणीत आवळ्याच्या उकडवून घेतलेल्या लहान फोडी घालाव्यात. त्याचबरोबर आवळा उकडवून घेतलेलं पाणी देखील घालावं.
५. त्यानंतर यात लाल तिखट मसाला, चवीनुसार मीठ व गूळ पावडर घालावी.
६. सगळ्यांत शेवटी हे सगळे मिश्रण व्यवस्थित चमच्याने हलवून घ्यावे. आता या मिश्रणाला थोडेसे पाणी सुटून मिश्रण किंचित ओले होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यावे.
आवळ्याची झटपट होणारी चटपटीत, चमचमीत, मसालेदार चटणी खाण्यासाठी तयार आहे. ही तयार चटणी थोडी थंड झाल्यावर आपण काचेच्या हवाबंद बरणीत स्टोअर करून महिन्याभरासाठी स्टोअर करून ठेवू शकतो.