Lokmat Sakhi >Food > हिवाळ्यात खायलाच हवी आवळ्याची चटपटीत चटणी! चवीला भारी आणि करायला सोपी, बघा रेसिपी

हिवाळ्यात खायलाच हवी आवळ्याची चटपटीत चटणी! चवीला भारी आणि करायला सोपी, बघा रेसिपी

Simple Recipe For Amla Chutney: आवळा कॅण्डी, आवळा सरबत, आवळा सुपारी हे आपण आवळ्याच्या प्रत्येक हंगामातच करतो. आता यावेळी आवळ्याची चटपटीत चटणी करून बघा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2022 01:01 PM2022-12-08T13:01:12+5:302022-12-08T15:06:40+5:30

Simple Recipe For Amla Chutney: आवळा कॅण्डी, आवळा सरबत, आवळा सुपारी हे आपण आवळ्याच्या प्रत्येक हंगामातच करतो. आता यावेळी आवळ्याची चटपटीत चटणी करून बघा..

Amla chutney recipe, How to make tasty delicious amla or gooseberry chutney? aawla chutney recipe   | हिवाळ्यात खायलाच हवी आवळ्याची चटपटीत चटणी! चवीला भारी आणि करायला सोपी, बघा रेसिपी

हिवाळ्यात खायलाच हवी आवळ्याची चटपटीत चटणी! चवीला भारी आणि करायला सोपी, बघा रेसिपी

Highlightsलोणचं म्हणा किंवा चटणी म्हणा.. हा पदार्थ मात्र एकदम चवदार आणि जेवणात रंगत आणणारा आहे, हे मात्र नक्की.

सध्या बाजारात पिवळसर टपोरे आवळे खूप जास्त प्रमाणात आले आहेत. व्हिटॅमिन सी आणि ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असलेलं हे फळ एरवी वर्षभर चाखायला मिळत नाही. त्यामुळे सध्या बाजारात फ्रेश आवळे मिळत आहेत, तर त्याचा पुरेपूर उपयोग आरोग्यासाठी करून घ्यायला हवा. आवळ्याचे वेगवेगळे पदार्थ अनेकजणी नेहमीच करतात. आता यावेळी ही खास रेसिपी वापरून आवळ्याची चटणी करून बघा. काही जण या रेसिपीनुसार आवळ्याचं लोणचं देखील घालतात. लोणचं म्हणा किंवा चटणी (Amla chutney recipe) म्हणा.. हा पदार्थ मात्र एकदम चवदार आणि जेवणात रंगत (tasty delicious amla or gooseberry chutney) आणणारा आहे, हे मात्र नक्की.

 

कशी करायची आवळा चटणी?
ही रेसिपी इन्स्टाग्रामच्या meghnasfoodmagic या पेजवर शेअर करण्यात आली आहे. 
साहित्य 
अर्धा किलो आवळे
१ टेबलस्पून तेल

देसी गर्ल प्रियांका चोप्राची मोठी भरारी, प्रभावशाली महिलांच्या यादीत स्थान.. मोठ्या जिद्दीची कहाणी..
बडिशेप, जिरे, मोहरी, मिरे, मेथ्या असं सगळं मिळून एक ते दिड टेबलस्पून
१ टीस्पून धने
चिमुटभर हिंग
अर्धा कप गूळ
चवीनुसार मीठ आणि लाल तिखट


कृती
१. सगळ्यात आधी आवळे वाफेवर शिजवून घ्या. कुकरमध्ये ठेवूनही एक शिट्टी घेऊन आवळे शिजवू शकता.

२. त्यानंतर आवळ्याच्या फोडी करून बिया काढून टाका. 

उरलेल्या भाताचा उपयोग करून मिळवा चमकदार त्वचा! खास उपाय, ॲक्ने- डार्क सर्कल्सही होतील कमी

३. गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यात तेल टाका. तेल गरम झाल्यावर सगळे मसाल्याचे साहित्य आणि धने घाला. सगळं साहित्य व्यवस्थित परतून घेतलं की चिमुटभर हिंग घाला.

४. त्यानंतर त्यात शिजवून घेतलेल्या आवळ्याच्या फोडी घालून ५ ते ६ मिनिटे परतून घ्या. 

५. नंतर गूळ घाला. गूळ सुरुवातीला विरघळेल आणि नंतर सगळेच पदार्थ एकजीव होऊ लागतील. हे सगळं मंद आचेवरच करावं. 

६. मिश्रण घट्ट होऊ लागलं की मग मीठ, तिखट आणि हळद घालावी. असेल तर थोडं काळं मीठही घाला. 

७. आवडत असेल तर सगळ्यात शेवटी आलं किसून टाका. ५ मिनिटे वाफ आली की आवळ्याची चटपटीत चटणी झाली तयार.  

 

Web Title: Amla chutney recipe, How to make tasty delicious amla or gooseberry chutney? aawla chutney recipe  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.