Join us  

आवळ्याची आंबट-गोड-तिखट चटणी करा १० मिनिटांत, व्हिटॅमिन सीचा खजिना-प्रतिकारशक्तीही वाढेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2023 1:48 PM

amla chutney recipe | Indian gooseberry spicy chutney लहान मुलं आवळे खात नाहीत, तुरट चव आवडत नाही तर करा ही आवळ्याची पौष्टिक चटकदार चटणी

आवळा आपल्या बहुगुणी गुणधर्मांसाठी ओळखला जातो. हेल्दी आरोग्य राखण्यासाठी आवळा खाण्याचा सल्ला दिला जातो. शतकांपासून आवळ्याचा उपयोग रोग बरे करण्यासाठी केला जात आहे. व्हिटॅमिन सीने समृद्ध आवळ्याचे अनेक प्रकार केले जातात. आवळ्याचं लोणचं, मुरब्बा, कँडी, ज्यूस आणि च्यवनप्राशच्या रूपात सेवन केले जाते. पण आपण कधी आवळ्याची चटणी ट्राय करून पाहिली आहे का?

आवळ्याची चटणी फक्त तोंडाची चव वाढवत नाही तर,  आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते. काही लोकांना आवळा खायला नाही आवडत, त्यांना आपण आवळ्याची चटणी ही रेसिपी बनवून देऊ शकता. जेवताना तोंडी लावण्यासाठी आवळ्याची चटणी हा बेस्ट ऑप्शन आहे. चला तर मग या चटकदार चटणीची कृती पाहूयात(amla chutney recipe | Indian gooseberry spicy chutney).

आवळ्याची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य

आवळा

तेल

मेथी दाणे

जिरं

बडीशेप

उडीद डाळ

हळद

लाल सुक्या मिरच्या

मीठ

कोथिंबीर

कृती

सर्वप्रथम एका भांड्यात पाणी घेऊन उकळवत ठेवा, त्यावर एक चाळणी ठेवा, त्यात आवळ्याचे तुकडे ठेवा, व ५ मिनिटांसाठी झाकण ठेऊन एक वाफ द्या. यामुळे आवळ्यातीळ कडवटपणा कमी होईल. आता कढई गरम करण्यासाठी ठेवा, त्यात एक चमचा तेल घाला, तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा मेथी दाणे, जिरं, बडीशेप, उडीद डाळ घालून साहित्य भाजून घ्या. त्यानंतर त्यात हळद, ४ लाल सुक्या मिरच्या, चवीनुसार मीठ, व आवळ्याचे काप घालून मिश्रण मिक्स करा. त्यावर ५ मिनिटांसाठी झाकण ठेऊन शिजवून घ्या.

मिश्रण थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. त्यात चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण वाटून घ्या. तयार चटणी एका हवाबंद डब्यात साठवून ठेवा. अशा प्रकारे आवळ्याची चटकदार चटणी खाण्यासाठी रेडी.

आवळा चटणी खाण्याचे फायदे

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. मजबूत प्रतिकारशक्ती शरीराला अनेक संक्रमणांपासून वाचवते. व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त, त्यात व्हिटॅमिन-ए, फायबर, फॉस्फरस, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट, लोह, अँटीऑक्सिडेंट, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स