Join us  

Amla ladoo recipe: थंडीत इम्यूनिटी वाढवण्यासाठी कमी खर्चात करा पौष्टीक आवळ्याचे लाडू; 'ही' घ्या झटपट रेसेपी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 1:55 PM

Amla ladoo recipe : थंडीत इम्यूनिटी वाढवण्यासाठी काही मिनिटात करा पौष्टीक आवळ्याचे लाडू; ही घ्या झटपट रेसेपी

हिवाळ्यात आवळा मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो. ते अत्यंत पौष्टिक आणि व्हिटॅमिन-सी युक्त आवळे अँटिऑक्सिडंट्सनी समृद्ध असतात. जे आपल्या एकूण आरोग्यासाठी खूप चांगले आहेत. (Immunity boosting foods)   रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी लिंबूवर्गीय फळांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.  तुम्ही त्याचे स्वादिष्ट लाडू बनवू शकता. जर तुमच्या मुलांना आवळा खायला आवडत नसेल तर आवळा खाण्याचा हा उत्तम मार्ग आहे. ( Immunity booster Amla Laddu)

आवळा कच्चा खाल्ल्याने किंवा त्याचा रस रोज प्यायल्याने दात आणि हिरड्या मजबूत होतात. याशिवाय श्वासाची दुर्गंधीही दूर करते. रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत होते. आवळ्यामध्ये क्रोमियम नावाचे तत्व आढळते, जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. आवळा हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम फळ आहे. म्हणूनच कच्चा आवळा खायला आवडत नसेल तर तुम्ही  आवळ्याचे लाडू नक्की ट्राय करायला हवेत.  (Amla laddoo recipe at home)

आवळा लाडूची रेसेपी

1)  आवळा स्वच्छ धुवून एका भांड्यात ठेवा. नंतर आवळे पाण्यात काही मिनिटे उकळा आणि थोडे मऊ झाल्यावर बाहेर काढा. 

2) मग किसून बाजूला ठेवा. कढईत किसलेला आवळा आणि साखर घाला. चांगले हलवा. मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा. 

3) वेलची पूड घालून पुन्हा मिक्स करा. गॅसवरून काढून त्यात चिरलेले बदाम आणि काजू घाला.

4) हाताला थोडे तुप लावून घ्या आणि आवळ्याच्या मिश्रणाचे छोटे गोळे बनवा. आवळा लाडू तयार असून हवाबंद डब्यात ठेवा. हे तुम्ही लाडू २-३  महिने आरामात खाऊ शकता.

1)

2)  

टॅग्स :अन्नपाककृतीआरोग्यहेल्थ टिप्स