हिवाळ्यात भाज्या व फळे अत्यंत ताजी आणि फ्रेश विकायला असतात. या सिझनल भाज्या - फळांचा आहारात समावेश करायला हवा. शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी या काळात आहारात (Amla Rice Recipe) काही पदार्थांचा आवर्जून समावेश केला जातो. हिवाळ्यात आहारात असायलाच (Healthy Gooseberry Rice) पाहिजे अशा पदार्थांमध्ये आंबट - गोड, तुरट चवीचा 'आवळा' असतोच. फक्त हिवाळ्यातच विशेष करुन मिळणाऱ्या या आवळ्याचे अनेक चविष्ट आणि रुचकर पदार्थ तयार करता येतात(How To Make Amla Rice At Home).
आवळ्याचा मुरांबा, लोणचं, चटणी, आवळा कँडी असे अनेक पदार्थ घरोघरी तयार केले जातात. याच आवळ्यापासून आपण मस्त आंबट- गोड, तुरट चवीचा 'आवळा राईस' तयार करू शकतो. थंडीच्या दिवसांत मिळणारी ओली कच्ची हळद, आवळा आणि आलं वापरून आपण हा राईस झटपट तयार करू शकतो. अगदी कमी साहित्यात झटपट तयार होणारा असा आवळा राईस (Indian gooseberry rice recipe) कसा करायचा याची सोपी रेसिपी पाहूयात. यंदाच्या हिवाळ्यात आवळ्याचे अनेक पदार्थ तयार कराच पण सोबतच आंबट- गोड, तुरट चवीचा 'आवळा राईस' नक्की करुन पाहाच.
साहित्य :-
१. ओली कच्ची हळद - १ (मध्यम आकाराचा तुकडा किसून घ्यावा)
२. आवळे - ५ ते ६ (किसून घ्यावेत)
३. आलं - १ (मध्यम आकाराचे आलं किसून घ्यावे)
४. मोहरी - १ टेबलस्पून
५. हिंग - १/२ टेबलस्पून
६. हिरव्या मिरच्या - ३ ते ४ हिरव्या मिरच्या
७. कडीपत्ता - ६ ते ७ पानं
८. लाल मिरच्या - २ ते ३ मिरच्या
९. काजू - २ टेबलस्पून
१०. तेल - गरजेनुसार
११. तूप - गरजेनुसार
१२. कोथिंबीर - १ टेबलस्पून
१३. मीठ - चवीनुसार
१४. तांदूळ - १ कप (शिजवून भात तयार करून घ्यावा)
ढोकळा कायम फसतो, फुगतच नाही? ८ टिप्स- विकतपेक्षा हलका ढोकळा करा घरच्याघरीच...
कृती :-
१. सगळ्यात आधी कच्ची ओली हळद, आलं यांची सालं काढून किसणीवर बारीक किसून घ्यावेत. याचप्रमाणे आवळे देखील स्वच्छ धुवून बारीक किसून घ्यावेत.
मूग डाळीचा पराठा खाऊन तर पाहा, मुलांच्या डब्यासाठी पौष्टिक झटपट पदार्थ...
२. आता एका मोठ्या कढईत तेल घेऊन त्यात भातासाठीची खमंग फोडणी तयार करून घ्यावी. फोडणीसाठी तेल घेऊन त्यात मोहरी, हिंग, हिरव्या मिरच्या, कडीपत्ता, लाल मिरच्या, काजू घालावेत.
३. फोडणी झाल्यानंतर त्यात किसलेलं आलं, कच्ची ओली हळद व आवळे घालावेत. त्यानंतर हे सगळे जिन्नस २ ते ३ मिनिटे परतवून व्यवस्थित शिजवून घ्यावेत.
४. सगळ्यात शेवटी यात आधीच शिजवून घेतलेला भात घालावा. त्यानंतर सगळे जिन्नस चमच्याने हलवून एकजीव करून घ्यावेत.
आपला गरमागरम चटपटीत, आंबट - गोड आवळा राईस खाण्यासाठी तयार आहे. पापड, लोणचं, चटणी सोबत हा आवळा राईस खाण्यासाठी सर्व्ह करावा.