Lokmat Sakhi >Food > पितृपक्षाच्या स्वयंपाकात घरोघरी केली जाणारी अमसूल चटणी! पित्तशामक चटणीची चटकदार रेसिपी 

पितृपक्षाच्या स्वयंपाकात घरोघरी केली जाणारी अमसूल चटणी! पित्तशामक चटणीची चटकदार रेसिपी 

कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्रात पितृपक्षाच्या स्वयंपाकात हमखास केला जाणारा एक पदार्थ म्हणजे अमसूल चटणी. ही चटणी करण्यासाठी घ्या ही सोपी रेसिपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 12:53 PM2021-09-23T12:53:48+5:302021-09-23T12:54:56+5:30

कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्रात पितृपक्षाच्या स्वयंपाकात हमखास केला जाणारा एक पदार्थ म्हणजे अमसूल चटणी. ही चटणी करण्यासाठी घ्या ही सोपी रेसिपी.

Amsul chutney made at home in pitru paksha! A savory recipe for chutney | पितृपक्षाच्या स्वयंपाकात घरोघरी केली जाणारी अमसूल चटणी! पित्तशामक चटणीची चटकदार रेसिपी 

पितृपक्षाच्या स्वयंपाकात घरोघरी केली जाणारी अमसूल चटणी! पित्तशामक चटणीची चटकदार रेसिपी 

Highlightsअमसूल हे पित्तनाशक आहे. त्यामुळे ज्यांना वारंवार अपचनाचा, पित्ताचा त्रास होतो, त्यांनी नियमितपणे अमसूल खावे.

गणपतीची धामधूम संपली आणि त्यांना निरोप दिला की घरोघरी सुरु होते पक्ष पंधरवाड्याची लगबग. आपल्या पुर्वजांचे स्मरण करण्याचा हा पंधरवाडा. या काळात पुर्वजांचे स्मरण करून त्यांच्यासाठी पुजाविधी केला जातो. या दिवशी जो स्वयंपाक केला जातो तो ठरलेला असतो आणि वर्षांनुवर्षांपासून तोच ठराविक स्वयंपाक घरोघरी केला जातो. अर्थात मराठवाडा, कोकण, विदर्भ, खान्देश येथील संस्कृतीनुसार या स्वयंपाकात काही पदार्थ कमी- जास्त असू शकतात. 

 

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पितृपक्षाच्या स्वयंपाकात हमखास केला जाणारा एक पदार्थ म्हणजे अमसूलाची चटणी. ही चटणी करताना अनेकवेळा काहीतरी गडबड होते आणि चटणीचे प्रमाण हुकते. चटणीची चव बिघडली किंवा एखादा पदार्थ हुकला, की आपोआपच जेवणाची रंगत कमी होते आणि मग आपल्यालाच मनोमन या गोष्टीचे दु:ख होते. कारण पक्ष असतील त्या दिवशी आपल्या घरी येणारी प्रत्येक व्यक्ती पोटभर जेवून आणि तृप्त होऊनच घराबाहेर पडली पाहिजे, अशी भाबडी मानसिकता घरातल्या प्रत्येकाची असते. त्यामुळे चटणीपासून सुरुवात करूया. म्हणूनच तर आहारतज्ज्ञ कांचन बापट यांनी सांगितलेली अमसूल चटणीची चटकदार रेसिपी घ्या आणि करून बघा. 

अमसूल चटणीसाठी लागणारे साहित्य
८ ते १० अमसूल, १ टीस्पून जीरे, ७- ८ मीरे, खडेमीठ, गुळ.

 

कशी करायची अमसूल चटणी?
- अमसूल चटणी करण्यासाठी सगळ्यात आधी ८ ते १० अमसूल गरम पाण्यात भिजत टाका. साधारणपणे एक ते दिड तास अमसूल भिजू द्यावेत.
- यानंतर जिरे, मीरे आणि खडेमीठ मिक्सरमध्ये फिरवून बारिक वाटून घ्यावेत.
- आता या मिश्रणात तास- दिड तास भिजलेले अमसूल टाकावेत आणि ते देखील वाटून घ्यावेत.
- यानंतर त्यामध्ये अमसूलाच्या दुप्पट गुळ टाकावा आणि तो देखील मिक्सरमधून फिरवून घ्यावा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचे प्रमाण कमी किंवा जास्त करु शकता. 


- अमसूलाची चटकदार चटणी झाली तयार.
- अमसूलाची चटणी अशीच खाल्ली जाते किंवा मग कुणी आवडीनूसार त्याला तेल, मोहरी, जिरे, हिंग टाकून फोडणी देखील घालतात. त्यामुळे तुमच्या आवडीनूसार फोडणी दिली किंवा नाही दिली तरी चालते. 
- ही चटणी जर तिखट करायची असेल तर त्यामध्ये घालण्यात येणाऱ्या मिऱ्यांचं प्रमाण वाढवावं किंवा मग त्यामध्ये थोडं लाल तिखट टाकावं.

 

अमसूल खाण्याचे फायदे
- अमसूल हे पित्तनाशक आहे. त्यामुळे ज्यांना वारंवार अपचनाचा, पित्ताचा त्रास होतो, त्यांनी नियमितपणे अमसूल खावे.
- खाज येणे, पुरळ येणे अशा त्वचाविकारांसाठीही अमसूल फायदेशीर आहे.
- शरीरातील उष्णता वाढली असल्यास अमसूल खाण्याचा सल्ला दिला जातो. 
- मानसिक ताण आणि थकवा घालविण्यासाठीही अमसूल उपयुक्त ठरते.
- आजारपणामुळे झालेली शारीरिक झीज भरून येण्यासाठीही अमसूलाचे पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो.
- तोंडाची चव गेली असेल, अन्नावरची वासना उडाली असेल तर अशा व्यक्तींना अमसूलाची चटणी द्यावी.

 

Web Title: Amsul chutney made at home in pitru paksha! A savory recipe for chutney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.