Lokmat Sakhi >Food > पावसाळ्यात झकास बेत, गरम खिचडी-अमसूल सार! पचायला हलका, पित्तनाशक अमसूल सार रेसिपी

पावसाळ्यात झकास बेत, गरम खिचडी-अमसूल सार! पचायला हलका, पित्तनाशक अमसूल सार रेसिपी

पावसाळ्यात रात्रीच्या जेवणात काहीतरी हलकं फुलकं, पचायला सोपं आणि पौष्टिक हवं असेल, तर गरमागरम खिचडी आणि अमसूलाचा सार हा बेत जरूर करा.. सूप म्हणून पिण्यासही अमसूल सार हा एक उत्तम पदार्थ आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 02:22 PM2021-08-17T14:22:15+5:302021-08-17T14:24:00+5:30

पावसाळ्यात रात्रीच्या जेवणात काहीतरी हलकं फुलकं, पचायला सोपं आणि पौष्टिक हवं असेल, तर गरमागरम खिचडी आणि अमसूलाचा सार हा बेत जरूर करा.. सूप म्हणून पिण्यासही अमसूल सार हा एक उत्तम पदार्थ आहे.

Amsul or kokam saar, soup recipe. tasty and healthy dish for monsoon | पावसाळ्यात झकास बेत, गरम खिचडी-अमसूल सार! पचायला हलका, पित्तनाशक अमसूल सार रेसिपी

पावसाळ्यात झकास बेत, गरम खिचडी-अमसूल सार! पचायला हलका, पित्तनाशक अमसूल सार रेसिपी

Highlightsगरमागरम सार खिचडीसोबत खायला तर चवदार लागतोच पण आपण सूप म्हणूनही तो पिऊ शकतो. 

मस्त रिमझिम बरसणारा पाऊस पडत असेल, तर अशावेळी काहीतरी वेगळं खावंस वाटतं. असं वाटत असेल तर अमसुलाचा सार आणि गरमागरम खिचडी साजूक तुप हा एक झकास बेत होऊ शकतो. अतिशय पाचक असणारे अमसुलाचे सार पावसाळ्यात आवर्जून प्यायला हवे. कारण पावसाळ्यात जठराग्नी मंद झाल्यामुळे अन्न पचनास त्रास होताे. त्यामुळे पचन संस्थेचे काम सुरळीत चालू ठेवण्यासाठी पावसाळ्यात अधूनमधून अमसुलाच्या सारचा डोस घ्यायलाच हवा.

 

अमसूल खाण्याचे फायदे 
- अमसूल हे पित्तनाशक आहे. त्यामुळे ज्यांना वारंवार पचनाचा, पित्ताचा त्रास होतो, त्यांनी अमसूल खावे.
- खाज येणे, पुरळ येणे अशा त्वचाविकारांसाठीही अमसूल फायदेशीर आहे. 
- शरीरातील उष्णता कमी करणे, मानसिक ताण आणि थकवा घालविण्यासाठीही अमसूल उपयुक्त ठरते.
- आजारी व्यक्तीसाठीही शारीरिक झीज भरून येण्यासाठी अमसूलाचा सार उपयुक्त ठरतो.
- तोंडाची चव गेली असेल, अन्नावरची वासना उडाली असेल तर अशा व्यक्तींना अमसूलाचा सार अवश्य द्यावा.

अमसूल सारसाठी लागणारे साहित्य
७ ते ८ अमसूल, दीड टेबलस्पून गूळ, १ टिस्पून तूप, दोन बाऊल पाणी, जिरे, हिंग, मध्यम आकाराची हिरवी मिरची, कोथिंबीर, चवीनुसार मीठ

 

कसा करायचा अमसूल सार?
- सगळ्यात आधी तर कोमट पाण्यात अमसूल भिजत घाला. अमसूल साधारणपणे एक तास भिजले पाहिजेत.
- यानंतर कुकरच्या भांड्यात हे अमसूल घाला, थोडे पाणी टाका आणि एक शिट्टी झाली की गॅस बंद करा.
- कुकर थंड झाल्यावर वाफावलेले अमसूल चांगले चोळून घ्या. चिंचेचा कोळ काढतो, तसाच अमसुलाचा कोळ काढून घ्यावा. गाळणीने गाळून घ्यावा. 
- यानंतर गाळलेल्या अमसूलाच्या गरात पाणी टाकावे. त्यामध्ये गुळ, मीठ टाकावे आणि ते उकळत ठेवावे.


- दुसरीकडे गॅसवर फोडणीसाठी छोटी कढई ठेवावी. या कढईमध्ये तूप टाकावे. तूप गरम झाले की त्यात जिरे आणि मिरचीचे तुकडे टाकावेत. फोडणी झाली की त्यामध्ये चिमुटभर हिंग घालावे.
- केलेली फोडणी अमसूलाच्या सारामध्ये टाकावी. सार उकळत आला की त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी आणि गॅस बंद करावा. 
- गरमागरम सार खिचडीसोबत खायला तर चवदार लागतोच पण आपण सूप म्हणूनही तो पिऊ शकतो. 

 

Web Title: Amsul or kokam saar, soup recipe. tasty and healthy dish for monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.