श्रावणातील मंगळागौरीचा सण म्हणजे स्त्रियांसाठी पर्वणीच असते. मंगळागौरी साजरी करताना सगळ्या स्त्रिया अगदी नटून - थटून, भरजरी साड्या, दागिने घालून तयार असतात. हा सण म्हणजे खेळ, पूजा, नाच, गाणी, उखाणे, खाण्याची मेजवानी असा झक्कास बेत असतो. सकाळी मंगळागौर आणि महादेवाच्या पिंडीची पूजा आणि रात्री जागरण करून मंगळागौरीचे खेळ असा या दिवसाचा कार्यक्रम असतो. दिवसभर मंगळागौरीचे खेळ खेळून, नाच गाणी करून भूक लागली की मग या खास दिवशी बनवल्या जाणाऱ्या पदार्थांवर ताव मारला जातो.
श्रावण महिना, त्यात येणारे सण व त्या - त्या सणाला केले जाणारे विशेष पदार्थ अगदी वैशिष्टयपूर्ण असतात. रात्री जागरण करून खेळ खेळणे ही या व्रताची खासियत आहे. त्या जागरणासाठी आप्तेष्ट बायका आणि शेजार पाजारच्या बायका यांना बोलावतात. मग मुली झिम्मा-फुगड्या खेळतात, उखाण्यासह नवर्याचे नाव घेतात, गाणी म्हणतात. याचबरोबर मंगळागौरीच्या निमित्ताने बनवण्यात येणाऱ्या खास पदार्थांचा आस्वाद घेतला जातो. या मंगळागौरीच्या पदार्थांमध्ये भांजणीचे वडे ( Bhajaniche Vade), मटकीची उसळ, मूगडाळीची खिचडी, गाजराची कोशिंबीर आणि काही गोडाधोडाचे पदार्थ असतात. अशा या मंगळागौरीच्या पारंपरिक पदार्थांमधील भाजणीचे वडे बनवण्याची सोपी कृती पाहूयात(Mangalagouri Special : Bhajaniche Vade).
साहित्य :-
१. थालीपीठाची भाजणी - २ ते ३ कप
२. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून
३. हळद - १/२ टेबलस्पून
४. ओवा - १/२ टेबलस्पून
५. पांढरे तीळ - १ टेबलस्पून
६. तेल (मोहनासाठी) - २ ते ३ टेबलस्पून
७. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
८. हिरव्या मिरचीची पेस्ट - १ टेबलस्पून
९. मीठ - चवीनुसार
भजी - वडे एकदम गोल गरगरीत एकसारखे होण्यासाठी १ सोपी ट्रिक, सणावाराला करा उत्तम भजी - वडे...
कृती :-
१. मोहनासाठी घेतलेले तेल चांगले गरम करून घ्यावे.
२. एका मोठ्या बाऊलमध्ये थालीपीठाची भाजणी घ्यावी.
३. या भाजणीमध्ये, लाल तिखट मसाला, हळद, ओवा, पांढरे तीळ, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरचीची पेस्ट व चवीनुसार मीठ घालून घ्यावे.
४. आता हे सगळे जिन्नस सर्वप्रथम कोरडेच एकत्र करून घ्यावेत.
५. त्यानंतर या पिठात गरम करून घेतलेल तेल ओतावे व हातांनी हलकेच सगळीकडे पसरवून घ्यावे.
६. आता या पिठात थोडे थोडे पाणी घालून या पिठाचा घट्ट गोळा मळून घ्यावा.
मंगळागौरीसाठी निवडा पारंपरिक दागिने ? हे ८ दागिने मिरवा आनंदाने, सजेल मंगळागौर...
बाजारातून विकत आणलेले लादी पाव ताजे आहेत की शिळे हे कसे ओळखाल ? ८ टिप्स, खा ताजे मऊ पाव...
७. पीठ मळल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत.
८. बटर पेपर किंवा प्लॅस्टिक घेऊन त्यावर थोडे तेल सोडून एक एक पिठाचा गोळा घेऊन त्याचा वडा थापून घ्यावा. वडा थापून घेतल्यानंतर त्याच्या मधोमध एक छिद्र करून घ्यावे. यामुळे वडा खरपूस व खुसखुशीत तळून तयार होतो.
९. आता गरम तेलात हे भाजणीचे वडे खमंग तळून घ्यावेत.
आपले भाजणीचे वडे खाण्यासाठी तयार आहेत, हे वडे सर्व्ह करताना दह्यासोबत खाण्यासाठी सर्व्ह करावे.